मुख्यमंत्र्यांनी म्हटल्याप्रमाणे बाळासाहेब भोळे होते की, नाही माहित नाही. पण रोखठोक होते. कपटी, कावेबाज आणि खंजीरखुपशे नक्कीच नव्हते, असा पलटवार भाजपने मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यावर केला आहे. balasaheb Thackeray was not a hypocrite, conspirator and dagger-bearer
विशेष प्रतिनिधी
मुंबई : मुख्यमंत्र्यांनी म्हटल्याप्रमाणे बाळासाहेब भोळे होते की, नाही माहित नाही. पण रोखठोक होते. कपटी, कावेबाज आणि खंजीरखुपशे नक्कीच नव्हते, असा पलटवार भाजपने मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यावर केला आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भारतीय जनता पक्षावर निशाणा साधत भाजपने शिवसेनेला धोका दिला असल्याचा आरोप केला आहे. भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून मुख्यमंत्री ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.
भातखळकर म्हणाले की, ‘बाळासाहेब ठाकरे भोळे होते, भाजपने त्यांना वेळोवेळी कसं फसवलंय हे मी डोळ्यांनी पाहिलंय इति उद्धव ठाकरे. हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे भोळे होते की नाही हे माहीत नाही पण रोखठोक होते. कपटी, कावेबाज आणि खंजीरखुपशे नक्कीच नव्हते.’
विरोधी पक्षातील नेत्यांमध्ये मतभिन्नता मी समजू शकतो मात्र त्यांच्यातील सूडबुद्धी मला समजत नाही, ती वाढत चालली असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. बाळासाहेब ठाकरे भोळे होते. त्यांना भाजपने कशा पद्धतीने फसवले हे मी डोळ्यांनी पाहिले असल्याचा आरोपही मुख्यमंत्र्यांनी केला आहे.