• Download App
    शिवसेनेचे दुसरे वर्तुळ पूर्ण : आधी नथुरामचे समर्थन, आता उद्धव ठाकरे + तुषार गांधी मातोश्रीत भेट!!|Balasaheb Thackeray parise nathuram godse, but tushar gandhi meets Uddhav Thackeray at matoshree

    शिवसेनेचे दुसरे वर्तुळ पूर्ण : आधी नथुरामचे समर्थन, आता उद्धव ठाकरे – तुषार गांधी मातोश्रीत भेट!!

    प्रतिनिधी

    मुंबई : शिवसेना गेल्या अडीच वर्षांपासून एकापाठोपाठ एक राजकीय वर्तुळे पूर्ण करत चाललल्याचे दिसत आहे. आधी काँग्रेस + राष्ट्रवादीला कट्टर विरोध, नंतर त्यांच्याशी महाविकास आघाडी करून सरकार, शिवसेनेत फूट पडल्यानंतर सुषमा अंधारे यांच्यासारख्या नेत्याला शिवसेनेत उपनेतेपद देणे, कालच शिवसेनेच्या उमेदवाराला थेट कम्युनिस्टांचा पाठिंबा घेणे आणि त्या पाठोपाठ तुषार गांधी यांनी मातोश्रीवर येऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेणे अशी एकापाठोपाठ राजकीय वर्तुळे पूर्ण होत आहेत. काल बुधवार १२ ऑक्टोबर हा दिवस राजकीय वर्तुळे पूर्ण होण्याचा ठरला.Balasaheb Thackeray parise nathuram godse, but tushar gandhi meets Uddhav Thackeray at matoshree

    काल पुरोगाम्यांची फौज उद्धव ठाकरे यांना भेटायला आली, यात महात्मा गांधी यांचे पणतु तुषार गांधी आणि मेधा पाटकर यांचा समावेश होता.



    ‘नफरत छोडो, संविधान बचाओ’

    महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधी यांनी ‘नफरत छोडो, संविधान बचाओ’ अभियानांतर्गत उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर जाऊन भेट घेतली. त्यांच्या भेटीमुळे मात्र राजकीय चर्चेला उधाण आले आहे. तुषार गांधींसह फिरोज मिठीबोरवाला हे होते. शिवसेना प्रवक्त्या डॉ. मनीषा कायंदे या प्रसंगी उपस्थित होत्या. या अभियानात डॉ. जी.जी. पारीख, मेधा पाटकर यांच्यासह देशभरातील इतर आघाडीच्या आंदोलनकर्त्यांचा समावेश आहे. आम्ही उद्धव ठाकरे आणि शिवसेनेला आमची एकजूट दाखवण्यासाठी आलो आहोत. आपली लोकशाही, आपला देश वाचवण्याचा आमचा एकत्रित प्रयत्न म्हणून ‘नफरत छोडो, संविधान बचाव’ अभियानात शिवसेनेला सहभागी करून घेण्याचे आवाहनही आम्ही त्यांना केले आहे, असे तुषार गांधी म्हणाले.

     बाळासाहेबांचे नथुराम समर्थन

    1991 च्या लोकसभा निवडणुकीत पुण्याच्या टिळक चौकात अर्थात अलका टॉकीज चौकात झालेल्या शिवसेना भाजप युतीच्या जाहीर सभेत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी, “होय मला नथुरामचा अभिमान वाटतो”, असे उद्गार काढले होते. त्यांच्या या वक्तव्यावरून देशभरात प्रचंड गदारोळ माजला होता. त्यावेळी शिवसेनेत असलेले आणि सध्याचे राष्ट्रवादीचे अमृत महोत्सवी नेते छगन भुजबळ यांनी बाळासाहेबांच्या भाषणाचा धागा पकडून नाशिकमध्ये नथुरामचा पुतळा उभारण्याची घोषणा केली होती.

    आता मात्र उद्धव ठाकरे + तुषार गांधी भेटीने 12 ऑक्टोबर 2022 रोजी शिवसेनेचे नथुराम समर्थन ते गांधींची भेट हे वर्तुळ पूर्ण झाले आहे!!

    Balasaheb Thackeray parise nathuram godse, but tushar gandhi meets Uddhav Thackeray at matoshree

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Dadar station : महाराष्ट्रात सतर्कता; दादर स्टेशनजवळ स्वामीनारायण मंदिरात पोलिसांकडून मॉक ड्रिल; मुख्यमंत्र्यांची बैठक

    Mumbai Metro ‘मुंबई मेट्रो मार्ग 3, टप्पा 2’ सेवेचा शुभारंभ ; फडणवीसांनी दाखवला हिरवा झेंडा

    Tata Cancer Hospital : मुंबईतील टाटा कॅन्सर हॉस्पिटलला धमकीचा मेल, पोलिसांनी तपास सुरू केला