• Download App
    मा. बाळासाहेब बघा, उध्दवजींना हिंदूंबाबत सुबुध्दी द्या, मनसेचे बॅनरवरून आवाहन|Balasaheb, give Uddhavji enlightenment about Hindus, appeal from MNS banner

    मा. बाळासाहेब बघा, उध्दवजींना हिंदूंबाबत सुबुध्दी द्या, मनसेचे बॅनरवरून आवाहन

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई :माननीय बाळासाहेब, बघा आपले सुपुत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हिंदू असून हनुमान चालीसा म्हणायला बंदी घालतायेत. हिंदूंनी लावलेले भोंगे काढताहेत. आपला ठाकरी बाणा आणि वारसा खऱ्या अर्थाने फक्त आता मा. राजसाहेब ठाकरे चालवत आहेतजमल्यास उद्धवजींना हिंदूंबाबत सुबुद्धी द्या, असे आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने बॅनरवरून केले आहे.Balasaheb, give Uddhavji enlightenment about Hindus, appeal from MNS banner

    सेनेचं हिंदुत्व हे केव्हाच संपलं आहे बाळासाहेब गेल्यावर हिंदुत्व निघून गेलं. आता सेनेचा रंग हिरवा झाला आहे, अशी टीका मनसेच्या बॅनरमध्ये करुन शिवसेनेला हिंदुत्वाची आठवण करुन देण्यात आली आहे.यापूर्वी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब यांच्यानंतर कट्टर हिंदु रक्षक राज ठाकरे, अशा आशयाचा बॅनर सेनाभवनासमोर लावण्यात आला होता.



    तो बॅनरही शिवसेना भवन आणि शिवाजी पार्क परिसरात लावला होता. विशेष म्हणजे लावण्यात आलेल्या गुडीपाडव्याच्या बॅनरमधून मनसेकडून शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्न केलाय. तब्बल 20 फुटाचा बॅनर होता. लोकांचं लक्ष वेधून घेत असलेल्या बॅनरची चर्चा त्यावेळी झाली होती.

    Balasaheb, give Uddhavji enlightenment about Hindus, appeal from MNS banner

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    अजित पवारांच्या exit मुळे ZP निवडणुकीच्या वेळापत्रकात बदल नाही; ठरलेल्या तारखेलाच निवडणुका!!

    देवेंद्र फडणवीस हे विरोधी पक्षनेता असताना सुद्धा दादा त्यांना “सीएम साहेब” म्हणायचे; त्यातून दादांना काय सुचवायचे होते??

    Sharad Pawar : शरद पवार म्हणाले- महाराष्ट्राचे कधीही न भरून निघणारे नुकसान; अजितदादांचा मृत्यू हा निव्वळ अपघात, कृपा करून इथे राजकारण आणू नये