• Download App
    Bajrang Sonavane : बीडचे खासदार बजरंग सोनवणेंविरुद्ध खंडपीठात अपात्रतेची याचिका, बेकायदा निवडीचा आरोप; हायकोर्टाची नोटीस | The Focus India

    Bajrang Sonavane : बीडचे खासदार बजरंग सोनवणेंविरुद्ध खंडपीठात अपात्रतेची याचिका, बेकायदा निवडीचा आरोप; हायकोर्टाची नोटीस

    Bajrang Sonavane

    विशेष प्रतिनिधी

    छत्रपती संभाजीनगर : शरद पवार गटाचे बीडचे खासदार बजरंग सोनवणे  ( Bajrang Sonavane ) यांना अपात्र ठरवण्याच्या मागणीसाठी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल झाली आहे. त्यावर न्या. ए. एस. वाघवसे यांनी सोनवणे यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे आदेश दिले आहेत. पुढील सुनावणी चार आठवड्यांनी होईल.

    बीडमधील सामाजिक कार्यकर्ते अमर नाईकवाडे यांनी ही याचिका दाखल केली आहे. बीड लोकसभा निवडणुकीत बजरंग सोनवणे यांनी भाजपच्या उमेदवार व माजी मंत्री पंकजा मुंडे यांचा ६ हजार मतांनी पराभव केला होता. मात्र आता निवडणूक निकालाच्या तीन महिन्यानंतर नाईकवाडे यांनी निवडीवर आक्षेप घेतला आहे.



    च्या तोंडावर तीन दिवस अगोदरच बीड येथील सहा आणि माजलगाव येथील एक अशी सात मतदान केंद्रे ऐनवेळी जाहीर करण्यात आली. नियमाप्रमाणे मतदान केंद्राची निर्मिती करताना राजपत्र प्रसिद्ध करणे आवश्यक आहे. मात्र प्रशासनाने ही प्रक्रिया पार न पाडता सात मतदान केंद्रांची निर्मिती केली.

    मतदान केंद्रांची संख्या वाढवल्याने मतदान केंद्रांची विभागणी झाली. त्याचा मतदानावर विपरीत परिणाम झाला. तसेच ४२६१ मतदारांना केंद्र सापडले नसल्याचा दावा करण्यात आला. मतदान केंद्र क्र. ६८ वर ईव्हीएम मशीनमध्ये वाढीव मतदान झाल्याने ७७४ मतदान मोजण्यात आले नाही. तसेच ११५६ पोस्टल मतेही मोजण्यात आली नाही, असे याचिकेत म्हटले आहे. याचिकाकर्त्यांतर्फे ॲड. शशिकांत शेकडे यांनी काम पाहिले. त्यांना ॲड. बाळासाहेब बोडखे, पृथ्वीराज ढाकणे यांनी सहकार्य केले.

    जातीच्या नावावर मते मागितल्याचा आरोप

    अर्ज दाखल करताना सोनवणे यांनी शेती आणि दुग्धव्यवसाय दाखवला. तसेच मालमत्ता २०० कोटी दाखवली आहे. ते येडेश्वरी कारखान्याचे व्यवस्थापकीय संचालक असून ते वेतनही घेतात ही बाब लपवण्यात आली. सोनवणे यांनी जातीच्या नावावर मतदान मागितले. त्यामुळे त्यांची निवड रद्द करण्याच्या मागणी याचिकेत करण्यात आली आहे.

    disqualification plea against Beed MP Bajrang Sonavan in high court

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Gold : सोन्याने नवा विक्रम केला प्रस्थापित, पहिल्यांदाच किंमत ९७ हजारांच्या जवळ पोहोचली

    अविश्वास ठरावाला तोंड देण्यापूर्वीच कर्जत जामखेड मध्ये रोहित पवार समर्थक नगराध्यक्षांचा राजीनामा; रोहित पवारांनी नगरपंचायतीची गमावली सत्ता!!

    Thackeray brothers ठाकरे बंधूंच्या व्हॅलेंटाईन गुलाबाला लांब लांब काटे; दोघांच्या सैनिकांनी फोडले वेगवेगळे फाटे!!