विशेष प्रतिनिधी
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे ताटातले वाटीत आणि वाटीले ताटात,असे लोकसभा निवडणुकीनंतर देखील संपायला तयार नाही. यातूनच बीडचे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार बजरंग सोनवणे यांनी आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांना फोन केल्याची माहिती समोर आली. त्यामुळे शरद पवार गटाचे बीडचे खासदार बजरंग सोनवणे हे अजित पवार यांच्या गळाला तर लागले नाही ना??, अशा चर्चेला आता उधाण आले आहे. Bajarang sonawane called ajit pawar, claims amol mitkari
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही नेत्यांमध्ये फोनवर जवळपास 10 मिनिटे चर्चा झाली, तर शरद पवार गटातील आणखी काही आमदार अजित पवार यांच्या संपर्कात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली.
बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी अजित पवारांना फोन केल्याचा दावा अमोल मिटकरी यांनी केला. मला पदरात घ्या, असं सोनवणे अजित पवारांना म्हणाले असतील, असा मोठा दावा अमोल मिटकरी यांनी केला. अमोल मिटकरी यांनी याबाबत ट्विट केले. यानंतर त्यांनी ‘टीव्ही 9 मराठी’ला याबाबत प्रतिक्रिया दिली.
अमोल मिटकरी काय म्हणाले?
ट्विटच्या माध्यमातून एक गोष्ट मला महाराष्ट्राच्या समोर आणायची आहे, तळागाळातील, सोशितांचे, वंचितांचे, शेतकऱ्यांचे, कष्टकऱ्यांचे, ऊसतोड कामगारांचे जे महत्त्वाचे प्रश्न आहेत, हे सोडवण्यासाठी एकच नेता सक्षम आहे, तो नेता म्हणजे अजित पवार. त्यामुळे आज सकाळी बजरंग सोनवणे यांचा अजित पवार यांना फोन आला. तो फोन साखर कारखान्याच्या संदर्भात होता. पण तो फोन असाही असू शकतो की, बजरंग सोनवणे हे अजित पवार यांच्याकडे आपल्याला पुन्हा आपल्या गटात घ्यावं, अशी विनंती करत असावेत. शरद पवार गटात आपलं भविष्य उज्ज्वल नाही. त्यामुळे त्यांनी अजित पवार गटात घेण्यासाठी विनंती केली असेल, असा दावा अमोल मिटकरी यांनी केला.
Bajarang sonawane called ajit pawar, claims amol mitkari
महत्वाच्या बातम्या
- केंद्राने कर हस्तांतरणापोटी राज्यांना जारी केला 1,39,750 कोटी रुपयांचा हप्ता
- Modi Cabinet 2024 List: नड्डा आरोग्य मंत्री, निर्मला अर्थमंत्री, धर्मेंद्र प्रधान शिक्षण मंत्री झाले… पाहा मंत्र्यांची संपूर्ण यादी
- Modi 3.0 : मुरलीधर मोहोळ यांना मंत्रिपदाची लॉटरी लागण्यापेक्षा खातेवाटपात मोठी जबाबदारी आणि शिकण्याची संधी!!
- टी20 विश्वचषकात भारताविरोधात पाकिस्तानच्या पराभवावर दिल्ली पोलिसांची मजेदार पोस्ट