• Download App
    BAHUBALI MARATHI : सुपरहिट बाहुबली सिनेमा आता येणार मराठीत- दिग्गज कलावंत आले एकत्र। BAHUBALI MARATHI: Superhit Bahubali Cinema Now Coming In Marathi- Veteran Artists Come Together

    BAHUBALI MARATHI : सुपरहिट बाहुबली सिनेमा आता येणार मराठीत- दिग्गज कलावंत आले एकत्र

    डॉ.अमोल कोल्हे यांनी बाहुबलीला या भूमिकेला आवाज दिला आहे


    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : दिग्दर्शक एस.एस.राजामौली यांनी दिग्दर्शित केलेल्या बाहुबली चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती मिळाली होती.  निर्मितीसाठीचे उच्च तंत्रज्ञान, व्हीएफएक्सचा वापर, विराट सेटस् आणि त्याला भव्य, उत्तुंग कलात्मक स्वरूप बाहुबलीच्या यशाचे मापदंड ठरले. बाहुबलीच्या या यशाला मानवंदना देत त्याप्रती सन्मान व्यक्त करण्यासाठी ‘शेमारू मराठीबाणा’ वाहिनीने आपल्या प्रेक्षकांसाठी एक आगळी भेट आणली आहे. अभिनेते – दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी या मराठमोळया ‘बाहुबली’ चित्रपटाची कलात्मक जबाबदारी सांभाळली असून अभिनेते डॉ. अमोल कोल्हे, अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, गश्मीर महाजनी, उदय सबनीस, संस्कृती बालगुडे, कौशल इनामदार, आदर्श शिंदे, बेला शेंडे  यासारखे अनेक नामवंत कलाकार याच्याशी जोडले गेले आहेत. BAHUBALI MARATHI: Superhit Bahubali Cinema Now Coming In Marathi- Veteran Artists Come Together

    बाहुबलीच्या मराठी वर्जनबद्दल बोलताना ‘शेमारू एंटरटेनमेंटचे मुख्य कार्यकारी अधिकारी हिरेन गडा म्हणाले की, “भारतीय सिनेसृष्टीच्या इतिहासातील सोनेरी पान म्हणजे बाहुबली हा चित्रपट. या चित्रपटाने फक्त कमाईचे नाही तर लोकप्रियतेचाही उच्चांक गाठला आहे. जगभरातील विविध भाषांमध्ये प्रदर्शित झालेला हा सिनेमा मराठी रसिकांसाठी मराठी रूपात, मराठी आवाजात आपल्या मराठी भाषेच्या लहेजात आणताना आम्हाला अतिशय आनंद  होत आहे’.



    ‘शेमारू मराठीबाणा’ वाहिनीच्या संकल्पनेचे स्वागत करताना भव्यतेसोबत मराठी भाषेचा लहेजा प्रेक्षकांना वेगळा अनुभव देणारा असेल असं अभिनेते डॉ. अमोल कोल्हे सांगतात. दिग्दर्शकाच्या नजरेतून काय निर्माण होऊ शकतं हे दाखवून देणारा बाहुबली मराठीत आणत त्याच ताकदीने पोहचवण्याचा ‘शेमारू मराठीबाणा’ वाहिनीचा प्रयत्न कौतुकास्पद असल्याचे सांगत याचा महत्त्वपूर्ण भाग होता आल्याचं समाधान अभिनेते–दिग्दर्शक प्रवीण तरडे व्यक्त करतात. गाजलेल्या कलाकृतीला मराठी मातीचा गंध असणार आहे हे नक्कीच प्रत्येकाला सुखावणारे आहे. आतापर्यंत  आपण  बाहुबलीचं  वैभव  पाहिलंय  आता  ते  आपल्यास  ऐकायला  मिळेल, असं अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने सांगितले. याचे लेखन स्नेहल तरडे यांनी केलं आहे.

    डॉ.अमोल कोल्हे यांनी बाहुबलीला आवाज दिला असून देवसेनेसाठी सोनाली कुलकर्णीचा आवाज लाभला आहे. मेघना एरंडे-शिवगामी, भल्लाल देव-गश्मीर महाजनी, कटप्पा-उदय सबनीस तर अवंतिका या व्यक्तिरेखेला संस्कृती बालगुडे हिचा आवाज असणार आहे. कौशल इनामदार यांचे संगीत दिग्दर्शन असून गीतलेखन वैभव जोशी, मिलिंद जोशी, अस्मिता पांडे यांनी केले आहे. आदर्श शिंदे, अवधूत गुप्ते, संजीव चिम्मलगी, हृषिकेश रानडे, हंसिका अय्यर, बेला शेंडे, केतकी माटेगावकर, मुग्धा कऱ्हाडे यांच्या आवाजात गाणी स्वरबद्ध करण्यात आली आहे. हा मराठमोळा अंदाज कसा असणार? जाणून घेण्याची उत्सुकता आता सगळ्यांनाच लागून राहिली आहे.

    BAHUBALI MARATHI : Superhit Bahubali Cinema Now Coming In Marathi- Veteran Artists Come Together

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Gold : सोन्याने नवा विक्रम केला प्रस्थापित, पहिल्यांदाच किंमत ९७ हजारांच्या जवळ पोहोचली

    अविश्वास ठरावाला तोंड देण्यापूर्वीच कर्जत जामखेड मध्ये रोहित पवार समर्थक नगराध्यक्षांचा राजीनामा; रोहित पवारांनी नगरपंचायतीची गमावली सत्ता!!

    Thackeray brothers ठाकरे बंधूंच्या व्हॅलेंटाईन गुलाबाला लांब लांब काटे; दोघांच्या सैनिकांनी फोडले वेगवेगळे फाटे!!