CM Uddhav Thackeray Black Money : शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर खा. नवनीत राणा यांचे पती व बडनेराचे अपक्ष आमदार रवी राणा यांनी गंभीर आरोप केले आहेत. राणा म्हणाले की, उद्धव ठाकरेंचा परदेशात प्रचंड काळा पैसा आहे. यासंबंधीचे पुरावे माझ्याकडे असून ते ईडी म्हणजेच अंमलबजावणीला संचालनालयाला देणार आहे. उद्धव ठाकरेंची कुठे-कुठे किती प्रॉपर्टी आहे, त्याची यादी माझ्य़ाकडे असल्याचाही दावा त्यांनी केला आहे. Badnera MLA Ravi Rana claims CM Uddhav Thackeray Black Money In Foreign will give Proof to ED Soon
विशेष प्रतिनिधी
मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर खा. नवनीत राणा यांचे पती व बडनेराचे अपक्ष आमदार रवी राणा यांनी गंभीर आरोप केले आहेत. राणा म्हणाले की, उद्धव ठाकरेंचा परदेशात प्रचंड काळा पैसा आहे. यासंबंधीचे पुरावे माझ्याकडे असून ते ईडी म्हणजेच अंमलबजावणीला संचालनालयाला देणार आहे. उद्धव ठाकरेंची कुठे-कुठे किती प्रॉपर्टी आहे, त्याची यादी माझ्य़ाकडे असल्याचाही दावा त्यांनी केला आहे.
शिवसेना Vs राणा दांपत्य
खा. नवनीत राणा यांचे जातप्रमाणपत्र हायकोर्टातून रद्द झाले होते. यासंबंधीची आक्षेप घेणारी याचिका शिवसेनेचे माजी खा. आनंदराव अडसूळ यांनी दाखल केली होती. दुसरीकडे, लोकसभेत खा. नवनीत राणा यांनी यापूर्वीही शिवसेनेविरुद्ध उघड भूमिका घेत खा. अरविंद सावंत यांच्यावर निशाणा साधला होता. कोरोना महामारीच्या काळात उद्धव ठाकरेंनी जाहीर केलेल्या माझे कुटुंब माझी जबाबदारी या उपक्रमावरही राणा यांनी कडाडून टीका केली होती.
लॉकडाऊनला प्रशासन पूर्णपणे जबाबदार असल्याचं म्हणत त्यांनी मुख्यमंत्र्यांवर हल्ला चढवला होता. जातप्रमाणपत्राविरोधात हायकोर्टात याचिका दाखल झाल्यावर आपल्याविरोधात मुद्दामहून राजकारण सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला होता. यानंतर नवनीत राणा यांचे पती आ. रवी राणा यांनी मुख्यमंत्री ठाकरेंवर गंभीर आरोप केला आहे. दरम्यान, शिवसेनेकडून अद्याप यावर प्रतिक्रिया आलेली नाही.
Badnera MLA Ravi Rana claims CM Uddhav Thackeray Black Money In Foreign will give Proof to ED Soon
महत्त्वाच्या बातम्या
- कोरोनामुक्त गावांमध्ये दहावी, बारावीचे वर्ग सुरू करण्यासाठी चाचपणी; मुख्यमंत्र्यांकडून निर्देश
- राष्ट्रवादी कार्यालय उदघाटनाला गर्दी, बारमध्ये कितीही लोक चालतात ; मग अधिवेशन दोनच दिवसच का ? ; देवेंद्र फडणवीस ठाकरे सरकारवर भडकले
- पंढरपूर विठ्ठल मंदिर समितीचे अध्यक्षपद नाराज काँग्रेसकडे ; शिर्डीचे राष्ट्रवादीकडे ; महाविकास आघाडीच्या समन्वय समितीच्या बैठकीत निर्णय
- कोरोनावरील बनावट औषधांचे पुणे कनेक्शन, विक्री प्रकरणी एकला अटक; कोट्यवधींचा मुद्देमाल जप्त
- घरोघरी लसीकरणाच्या आशा पल्लवित ; राज्य सरकारचा सीलबंद अहवाल उच्च न्यायालायात