• Download App
    Badlapur School Rape Case बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

    Badlapur School Rape Case : बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

    विशेष प्रतिनिधी

    बदलापूर : बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याला न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. या प्रकरणात शाळेचे अध्यक्ष, मुख्याध्यापिका, सेक्रेटरी यांनाही आरोपी बनवण्यात आले आहे Badlapur School Rape Case, Accused Akshay Shinde remanded to 14 days judicial custody

    बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी आज न्यायालयात हजर करण्यात आले. आरोपीला उल्हासनगरमधून कडेकोट बंदोबस्तात पोलिस ताफ्याने न्यायालयात आणण्यात आले. मागच्या वेळी आरोपीला 25 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती, जी आज संपत आहे. कोर्टाने आरोपी अक्षय शिंदे याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.


    विधानसभेसाठी पवारांचा ताटातलं वाटीतचा जुनाच फॉर्म्युला; भाजपचा “असाइनमेंट” आणि पंचायत गटांवर फोकसचा फॉर्म्युला!!


    ठाणे जिल्ह्यातील बदलापूर शहरातील नामांकित शाळेत दोन चिमुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचाराची घटना घडली होती. बदलापूरमधील नामांकित शाळेत लैंगिक अत्याचाराची घटना घडली. वय 4 आणि 6 वर्षांच्या चिमुकल्या मुलींवर अत्याचार झाला होता. या दोन्ही चिमुकल्या मुली लघुशंकेसाठी जात असताना, शाळेतील एका सफाई कर्मचाऱ्याने त्या दोघींवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे.

    कल्याण न्यायालयाने आरोपी अक्षय शिंदेला 14 दिवसांपर्यंत म्हणजेच 9 सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्यासोबतच याप्रकरणी शाळेचे अध्यक्ष, मुख्याध्यापिका आणि सेक्रेटरी यांनाही आरोपी बनवण्यात आले आहे. तसेच पॉक्सो गुन्ह्यात काही कलम वाढवण्यात आली आहेत.

    Badlapur School Rape Case, Accused Akshay Shinde remanded to 14 days judicial custody

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Maharashtra : राज्यातील कामगार कायद्यांमध्ये सुधारणा करुन महाराष्ट्र कामगार संहिता नियम तयार होणार!

    Savitribai Phule memorial नायगावात सावित्रीबाई फुले स्मारकासाठी 142.60 कोटी रुपये मंजूर; फडणवीस सरकारचा निर्णय!!

    त्यावेळी राज की उद्धव?, प्रश्नावर पवारांचे उत्तर “ठाकरे कुटुंबीय”; पण आता दोन्ही भावांच्या ऐक्यावर मात्र कानावर हात!!