विशेष प्रतिनिधी
मुंबई : बदलापूर पूर्वेमधील आदर्श शाळेतील दोन चिमुकल्यांवर अत्याचार झाल्याची घटना उघडकीस आल्यावर हजारो बदलापूरकर रस्त्यावर उतरले त्यांनी रस्ते आणि रेल्वे रोको केले. सकाळपासून पालकांनी आदर्श शाळेबाहेर आंदोलन सुरू केले. या घटनेतील दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली. पण ही कारवाई खूप संथ आहे, असा आरोप करून आंदोलक आदर्श शाळेत घुसले आणि त्यांनी शाळा फोडली. पोलिसांवरही दगडफेक केली. आता या प्रकरणात शिंदे – फडणवीस सरकार ऍक्टिव्ह झाले असून मुलींवरच्या अत्याचाराच्या चौकशीसाठी आता सरकारने विशेष तपास पथकाची स्थापना केली आहे.
नेमकं काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यलयाने एक्स या समाज माध्यमावर पोस्ट करत यासंदर्भात माहिती दिली. बदलापूर येथील घटना दुर्दैवी आहे. या घटनेची चौकशी करण्यासाठी पोलीस महानिरीक्षक दर्जाच्या वरिष्ठ आयपीएस अधिकारी आरती सिंग यांच्या अध्यक्षतेखाली विशेष तपास पथक गठीत करण्याचे निर्देश दिले आहेत, देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाकडून सांगण्यात आले.
बदलापूर येथील दुर्दैवी घटनेची चौकशी करण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिस महानिरीक्षक दर्जाच्या वरिष्ठ IPS अधिकारी आरती सिंग यांच्या अध्यक्षतेखाली SIT गठित करण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणातील दोषींवर कठोरातील कठोर कारवाई करण्यासाठी हा खटला जलदगती न्यायालयात चालविण्यासाठी आजच प्रस्ताव सादर करण्याचे निर्देशही ठाणे पोलिस आयुक्तांना दिल्याची माहिती त्यांनी दिली.
Badlapur Case Sit formed to probe said devendra fadnavis home minister
महत्वाच्या बातम्या
- Eknath shinde : मुख्यमंत्र्यांसाठी एक कोटी राख्यांचा संकल्प, राज्यातील बहिणींची कृतज्ञता
- Narendra modi :पंतप्रधान मोदी जगाला चकित करणार, रशियानंतर आता थेट युक्रेनला जाणार!
- Monkey Pox Principal Secretary : ‘मंकी पॉक्स’बाबत मोठी बैठक, प्रधान सचिव म्हणाले परिस्थितीवर पंतप्रधानांची नजर!
- Vishwa Hindu Parishad : मागासवर्गीयांना आपलेसे करण्यासाठी विश्व हिंदू परिषदेची देशभरात तब्बल 9000 ब्लॉक मध्ये धर्मसभा आणि संमेलने!!