• Download App
    Babasaheb Purandare: संयुक्त महाराष्ट्र कलादालनात शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंचे कलादालन उभारा ; भाजपची मागणी । Babasaheb Purandare: Establish Shivshahir Babasaheb Purandare's Art Gallery in United Maharashtra Art Gallery; BJP's demand

    Babasaheb Purandare: संयुक्त महाराष्ट्र कलादालनात शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंचे कलादालन उभारा ; भाजपची मागणी

    महाराष्ट्राच्या ऐतिहासिक स्मृती जागवणाऱ्या संयुक्त महाराष्ट्र कलादालनाची निर्मिती मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज मैदान (शिवाजी पार्क) येथे तब्बल 11 वर्षांपूर्वी करण्यात आली. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी पुढाकार घेऊन संयुक्त महाराष्ट्र लढ्याचा इतिहास पुढील पिढीला ज्ञात व्हावा, यासाठी या कलादालनाची निर्मिती महापालिकेच्या माध्यमातून केली. दुर्दैवी बाब म्हणजे मुंबई महापलिकेने पर्यटकांचा ओघ वाढावा यासाठी कोणतेही प्रयत्न केले नाही. Babasaheb Purandare: Establish Shivshahir Babasaheb Purandare’s Art Gallery in United Maharashtra Art Gallery; BJP’s demand


    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंचे कलादालन संयुक्त महाराष्ट्र कलादालनात उभारा अशी मागणी भाजपाने महापौर किशोरी पेडणेकर यांच्याकडे केली आहे. भाजपा नगरसेवक प्रभाकर शिंदे यांनी पत्र लिहून महापौरांकडे ही मागणी केली आहे.

    बाळासाहेब ठाकरे ज्या ऋषीतुल्य शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंना वंदनीय मानत होते. त्याच शिवशाहिरांच्या ऐतिहासिक कर्तृत्वाचे कलादालन बाळासाहेबांनी बांधलेल्या कलादालनातील पहिल्या मजल्यावर उभारण्यात यावे, अशी मागणी भाजपा नगरसेवक प्रभाकर शिंदे यांनी केली आहे.

    ही मागणी मान्य केल्यास बाळासाहेब आणि शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्यावर प्रेम करणाऱ्या अनेक पर्यटकांचा इथे ओघ वाढेल. असे झाल्यास हा स्वर्गीय बाळासाहेबांच्या दूरदृष्टीचा आणि भावनेचा मान असेल. तर स्वर्गीय शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंच्या कर्तृत्वाचा सन्मान असेल, असे या पत्रात म्हटले आहे.

    पत्रात काय ?

    महाराष्ट्राच्या ऐतिहासिक स्मृती जागवणाऱ्या संयुक्त महाराष्ट्र कलादालनाची निर्मिती मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज मैदान (शिवाजी पार्क) येथे तब्बल 11 वर्षांपूर्वी करण्यात आली. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी पुढाकार घेऊन संयुक्त महाराष्ट्र लढ्याचा इतिहास पुढील पिढीला ज्ञात व्हावा, यासाठी या कलादालनाची निर्मिती महापालिकेच्या माध्यमातून केली.
    कलादालनाच्या तळ घरात संयुक्त महाराष्ट्र चळवळी संबंधी छायाचित्रे, शिल्पचित्रे आणि माहिती फलक आहेत. तर तळ मजल्यावर या चळवळीत सहभागी असलेल्या नेत्यांची तैलचित्रे आहेत. तसेच, महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीचं, प्राचीन संस्कृतीचं, भौगोलिक समृद्धतेचं दर्शन घडवण्यावसाठी विविध कलात्मक बाबी येथे आहे. परंतु संयुक्त महाराष्ट्र कलादालन उभारल्यानंतरही याठिकाणी पर्यटकांचा ओघ वाढला नाही. आणि त्यापेक्षाही दुर्दैवी बाब म्हणजे मुंबई महापलिकेने पर्यटकांचा ओघ वाढावा यासाठी कोणतेही प्रयत्न केले नाही.



    कोट्यवधी रुपये खर्चून स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी ज्या भावनेने व दृष्टीने कलादालनाची निर्मिती केली होती, ते कलादालनच आज महापालिकेच्या इच्छेअभावी दुर्लक्षित आहे. बाळासाहेबांच्या दूरदृष्टीचा आणि भावनेचा एकप्रकारे महापालिकेतील सत्ताधाऱ्यांनी अपमानच केला आहे. परंतु अजूनही संधी गेलेली नाही. स्व. हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ज्या ऋषीतुल्य शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंना वंदनीय मानत होते. त्याच शिवशाहीरांच्या ऐतिहासिक कर्तृत्वाचे कलादान बाळासाहेबांनी बांधलेल्या कलादालनातील पहिल्या मजल्यावर उभारण्यात यावे.

    यामुळे हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब आणि शिवशाहीर बाबासाहेब यांच्यावर प्रेम करणाऱ्या अनेक पर्यटकांचा इथे ओघ वाढणारच. असे झाल्यास हा स्व.बाळासाहेबांच्या दूरदृष्टीचा व भावनेचा मान असेल तर स्व.शिवशाहीर बाबासाहेबांच्या कर्तृत्वाचा सन्मान असेल. या कलादालनातील पहिल्या मजल्यावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी टिपलेल्या गड किल्ल्यांच्या विहंगम छायाचित्र प्रदर्शनाच्या जागेत बाबासाहेब यांचे कलादालन उभारावे.

    इथे शिवशाहीर बाबासाहेबांनी निर्माण केलेले शिवचरित्र, त्यावर आधारित साहित्य, छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरलेली शस्त्र आदींचे प्रदर्शित करण्यात यावे. हीच शिवशाहीर बाबासाहेबांना खऱ्या अर्थाने श्रद्धांजली ठरेल. येथील गड किल्ल्यांची छायाचित्रे आणि बाबासाहेबांनी सांगितलेली गडकिल्ल्यांची महती यांचा सुरेख मिलाप या कलादालनात पाहायला मिळेल. तसेच, शिवशाहीर बाबासाहेबांना स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा आशीर्वाद लाभला होता, त्यामुळे सावरकर स्मारक शेजारी ही वास्तू असल्याने त्यांच्या नावाने कलादालन उभारण्यासाठी या व्यतिरिक्त दुसरी जागा योग्य असू शकत नाही.हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेबांनी जे स्वप्न पाहून संयुक्त महाराष्ट्र कलादालनाची उभारणी केली, त्या कलादालनात पर्यटक मोठ्या संख्येने भेट देतील असे आम्हाला वाटते. त्यामुळे संयुक्त महाराष्ट्र कालादालनाच्या पहिल्या मजल्यावर शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे कलादालन उभारण्यासाठी तातडीने धोरणात्मक निर्णय घेतला जावा, ही विनंती.

    Babasaheb Purandare : Establish Shivshahir Babasaheb Purandare’s Art Gallery in United Maharashtra Art Gallery; BJP’s demand

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Ajit Pawar : प्रत्येकजण आपला पक्ष वाढवण्याच्या प्रयत्नात असतो; शिवसेना शिंदे गटाच्या नाराजीवर अजित पवारांची प्रतिक्रिया

    Anjali Damania : पार्थ पवारांचे जमीन घोटाळा प्रकरण, न्यायालयामध्ये जाण्याचा दमानियांनी दिला इशारा

    Uday Samant : शिंदे गटाने फेटाळली नाराजीची चर्चा, मंत्री उदय सामंत म्हणाले – आमचे गाऱ्हाणे मुख्यमंत्र्यांना नाही तर कुणाला सांगणार