• Download App
    Baba Siddique Murder, Zishan Siddique, Anmol Bishnoi, Mumbai Police, PHOTOS, VIDEOS, News बाबा सिद्दिकी हत्येप्रकरणी मुलगा झीशानचा सवाल

    Baba Siddique : बाबा सिद्दिकी हत्येप्रकरणी मुलगा झीशानचा सवाल- पोलिस मास्टरमाइंडला का पकडत नाहीत, अनमोल बिष्णोईला घाबरता का?

    Baba Siddique

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : Baba Siddique राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत नेते बाबा सिद्दिकी यांच्या हत्येच्या तपासावरून त्यांचे पुत्र आणि आमदार झिशान सिद्दिकी यांनी मुंबई पोलिसांवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. कुख्यात गुंड अनमोल बिष्णोईची चौकशी करण्यात पोलिस टाळाटाळ करत असल्याचा आरोप करत झिशान सिद्दीकी यांनी थेट पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.Baba Siddique

    राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाबा सिद्दिकी यांची 12 ऑक्टोबर रोजी हत्या करण्यात आली होती. बाबा सिद्दिकी आपल्या मुलाच्या कार्यालयाकडे जात असताना, तीन अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळीबार केला होता. या घटनेनंतर त्यांना तातडीने लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी निर्मल नगर पोलिसांनी हरियाणा आणि उत्तर प्रदेशमधील दोन आरोपींना ताब्यात घेतले असून, मुंबई क्राईम ब्रँच या प्रकरणाचा तपास करत आहे.Baba Siddique



    नेमके काय म्हणाले झिशान सिद्दिकी?

    बाबा सिद्दिकी हत्याप्रकरणी पोलिसांच्या तपासासंदर्भात बोलताना झिशान सिद्दीकी यांनी, “मुंबई पोलिस अनमोल बिष्णोईला मुंबईत आणून चौकशी का करत नाहीत की या हत्येमागे नेमका कोण ‘मास्टरमाईंड’ आहे? मुंबई पोलिस अनमोल बिष्णोईला घाबरत आहेत का?”असा सवाल केला आहे.

    पोलिस लॉजिकल उत्तरे देत नसल्याचा आरोप

    झिशान सिद्दिकी यांनी पोलिसांच्या तपासाच्या पद्धतीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. “मुंबई पोलिस सध्या तर्कहीन उत्तरे देत आहेत,” असे ते म्हणाले. अनमोल बिष्णोईला आणण्यासाठी काय पुढाकार घेतला, असे पोलिसांना विचारले असता, आम्ही पीडितच्या मुलाला हे सांगू शकत नाही. अनमोल बिष्णोईला अलर्ट केले जाईल, असे उत्तर पोलिसांनी दिले. मी तुरुंगात जाऊन अनमोल बिष्णोईला अलर्ट करणार आहे का? अशा शब्दांत झिशान सिद्दिकी यांनी आपला संताप व्यक्त केला. मुंबई पोलिस लॉजिकल उत्तरे देत नसल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

    Baba Siddique Murder, Zishan Siddique, Anmol Bishnoi, Mumbai Police, PHOTOS, VIDEOS, News

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    IPS अंजना कृष्णांना केलेल्या दमबाजीचा मुद्दा अजितदादांनी बासनात गुंडाळला; पण त्यांच्याच बहिणीने आणि पुतण्याने तो पुन्हा तापविला!!

    Maharashtra Cabinet : मंत्रिमंडळाचे महत्त्वाचे निर्णय; शेतकऱ्यांना दिलासा, उपसा जलसिंचन योजनांसाठी वीज दर सवलतीला मुदतवाढ

    Prakash Ambedkar : प्रकाश आंबेडकर म्हणाले- ओबीसी-मराठ्यांचे ताट वेगळे पाहिजे, मराठा समाजाला ओबीसी म्हणून संबोधता येत नाही हे सुप्रीम कोर्टाने म्हटले