प्रतिनिधी
मुंबई : प्रसिद्ध कीर्तनकार ह. भ. प. बाबा महाराज सातारकर यांचे आज पहाटे 6.00 वाजता निधन झाले. ते ८६ वर्षांचे होते. त्यांच्या निधनामुळे अवघ्या महाराष्ट्रातील वारकरी संप्रदाय परंपरेतील आणि सातारकर फड परंपरेतील लाखोंच्या समुदायावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या पश्चात त्यांच्या दोन मुली ह. भ. प. भगवती महाराज, रासेश्वरी सोनकर आणि नातवंडे असा परिवार आहे. baba satarkar maharaj passed away
५ फेब्रुवारी १९३६ रोजी सातारच्या नामवंत गोरे सातारकर घराण्यात त्यांचा जन्म झाला होता. निळकंठ ज्ञानेश्वर गोरे हे त्यांचं मूळ नाव. मात्र, पुढे त्यांच्या कीर्तनाला मिळालेल्या व्यापक स्वीकृतीतून त्यांना “बाबा महाराज सातारकर” हे नाव मिळाले. ते आयुष्यभर त्यांच्यासोबत राहिले. नेरूळच्या आगरी कोळी भवनासमोरच्या एका वसाहतीत ते वास्तव्यास होते.
सातारकर फडाची परंपरा
महाराष्ट्राला प्रदीर्घ अशी कीर्तनाची ख्यातनाम कीर्तनकारांची परंपरा राहिली आहे. वारकरी संप्रदायातील प्रमुख कीर्तनकार फड म्हणून सातारकर घराण्याच्या फडाचे नाव मानाने घेतले जात असे. गेल्या चार पिढ्यांपासून सातारकरांच्या घरात प्रवचन आणि कीर्तनाची परंपरा होती. स्वत: बाबा महाराज सातारकरांनीही ही परंपरा मोठ्या अभिमानाने जपली आणि वाढवली होती. आता त्यांच्या कन्या ह. भ. प. भगवती महाराज ही परंपरा पुढे चालवत आहेत.
baba satarkar maharaj passed away
महत्वाच्या बातम्या
- कॅनडाशी सुधारू लागले संबंध! आजपासून भारत पुन्हा सुरू करणार व्हिसा सेवा
- Online Gaming : ऑनलाइन गेमिंग कंपन्यांना केंद्राने सुमारे १ लाख कोटी रुपयांच्या कर नोटीस पाठवल्या
- 22 जानेवारी 2024 : राम जन्मभूमी मंदिर उद्घाटनाचे पंतप्रधान मोदींना निमंत्रण!!
- संभाजी राजेंच्या आग्रहाखात जरांगे पाणी प्यायले, पण सरकारला ताळ्यावर आणि म्हणाले!!