विशेष प्रतिनिधी
मुंबई : शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी आज सकाळी एक ट्विट केले. आहे. ट्विटमध्ये संजय राऊत म्हणतात , “बाप बेटे जेल मधे जाणार! Wait and watch! कोठडीचे sanitization सुरू आहे.. जय महाराष्ट्र!” Baap Bete will go to jail; Sanjay Raut’s tweet
संजय राऊत यांनी मंगळवारी शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेतली. तेव्हा भाजप नेते किरीट सोमय्या, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजप नेते मोहित कंबोज यांच्यावर त्यांनी गंभीर आरोप केले. सोमय्या यांच्या मुलावरही आरोप केले. त्यानंतर भाजपकडूनही संजय राऊत यांना प्रत्युत्तर देण्यात आले. त्यानंतर आज संजय राऊत यांनी एक सूचक ट्विट केले.
सोमय्या यांनी नवी दिल्ली येथे पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यावर बेहिशेबी मालमत्तेचे आरोप करत राऊत यांना पुन्हा आव्हान दिले. त्यापूर्वी राऊत यांनी हे ट्विट केले होते.
Baap Bete will go to jail; Sanjay Raut’s tweet
महत्त्वाच्या बातम्या
- पाकिस्तान मध्ये “आधी हिजाब” सहजतेने मिळाला असता डॉ. सुब्रमण्यम स्वामी यांचे वक्तव्य
- मुंबई हायकोर्टाने महाराष्ट्र सरकारला फटकारले, ‘पोलीस ठाण्यांमध्ये सीसीटीव्ही बसवण्याच्या नावाखाली 60 कोटींची उधळपट्टी!’
- Ukraine Russia Crisis : परराष्ट्र मंत्रालयाकडून नियंत्रण कक्षाची स्थापना, युक्रेनमध्ये राहणाऱ्या भारतीयांसाठी हेल्पलाइन क्रमांक जाहीर
- गुजरातेतील शाळेत ‘माय रोल मॉडेल नथुराम गोडसे’ विषयावर वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन, वाद वाढताच एक अधिकारी निलंबित