विशेष प्रतिनिधी
मुंबई : अयोध्येतील राम जन्मभूमी मंदिरात रामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याचे निमंत्रण आल्याबद्दल थयथयाट करणाऱ्या उद्धव ठाकरेंनी अयोध्येचा रामविरुद्ध काळाराम असा डाव टाकून पाहिला, पण पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अयोध्येच्या मंदिरातल्या रामलल्लांच्या प्रतिष्ठापनाची सुरुवातच काळाराम मंदिरातल्या संकल्प पूजन करून उद्धव ठाकरेंचा तो डाव उध्वस्त केला. Ayodhya Ram vs Kalaram Uddhav Thackeray new plan
आपला पहिला डाव उध्वस्त झालेला पाहिल्यानंतर उद्धव ठाकरेंनी आज मातोश्री मध्ये पत्रकार परिषद घेऊन नवा डाव टाकला. उद्धव ठाकरे 22 तारखेला नाशिक मधल्या काळाराम मंदिरामध्ये येऊन पूजा आणि आरती करणार आहेत. या कार्यक्रमाचे निमंत्रण त्यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना खास पत्र लिहून दिले देशाच्या महामहिम राष्ट्रपती द्रौपदी यांच्या हस्ते खरे तर श्री रामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठेची पूजा व्हायला हवी होती. सोमनाथ मंदिराचा जिर्णोद्धराच्या वेळी तत्कालीन राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्याच हस्ते तिथे पूजा झाली होती, याची आठवण उद्धव ठाकरेंनी करून दिली.
राष्ट्रपतींना रामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे निमंत्रण गेले असले तरी प्रत्यक्षात प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची पूजा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. त्यामुळे त्या तिथे गर्दीतल्या एक बनून राहतील, त्या ऐवजी त्यांनी नाशिकच्या काळाराम मंदिरात 22 जानेवारीला येऊन पूजेत सहभागी व्हावे. आम्ही त्यांच्यासमवेत असलो तरी त्यांच्याबरोबर फोटोत कुठेही येणार नाही. काळारामाची प्रमुख पूजा राष्ट्रपतींच्या हस्ते होईल, असे उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
अयोध्येच्या राम मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते श्री रामलल्लांची प्राणप्रतिष्ठा होत असताना राष्ट्रपतींना त्याच दिवशी काळाराम मंदिरात बोलवून त्यांच्या हस्ते पूजा करण्याचा हा उद्धव ठाकरेंचा नवा डाव आहे.
पण राष्ट्रपतींचे कुठलेच कार्यक्रम हे एका पक्षाच्या किंवा एका नेत्याच्या निमंत्रणावर ठरत नसतात हे मुख्यमंत्री राहिलेल्या उद्धव ठाकरेंना माहिती असूनही त्यांनी हा नवा डाव टाकला आहे. पण त्यामागचे खरी कारणे त्यांना अयोध्येतले न आलेले निमंत्रण आणि त्याचबरोबर कालच पंतप्रधानांनी नाशिक दौऱ्यामध्ये केलेली काळारामाची पूजा ही आहेत. आपला पहिला डाव पंतप्रधानांनी उद्ध्वस्त केल्याचे पाहिल्यानंतरच उद्धव ठाकरे यांनी अचानक राष्ट्रपतींना काळाराम मंदिरातले पूजेचे निमंत्रण देऊन दुसरा डाव टाकून पाहिला आहे. आता हा दुसरा डाव भाजपचे नेते कशाप्रकारे उधळून लावतात हे पाहणे ठरणार आहे.
Ayodhya Ram vs Kalaram Uddhav Thackeray new plan
महत्वाच्या बातम्या
- विधानसभा अध्यक्षांचा कौल शिंदेंच्या पारड्यात; अजितदादांच्या मुख्यमंत्री पदाची चर्चा विरली हवेत!!
- उपराष्ट्रपतींना अयोध्येचे निमंत्रण; आधी वेळ कळवून परिवारासह घेणार श्री रामलल्लांचे दर्शन!!
- या वर्षी दहा पैकी नऊ सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग नफ्यात राहण्याची चिन्हं!
- ग्रीस समलिंगी विवाह, दत्तक प्रक्रियेस कायदेशीर मान्यता देणार!