प्रतिनिधी/ वृत्तसंस्था
गडचिरोली / मुंबई : गडचिरोलीतील ग्यारापट्टी जंगलात महाराष्ट्र पोलिसांच्या c60 युनिटने तब्बल 26 नक्षलवाद्यांना कंठस्नान घातले. यामध्ये कुप्रसिद्ध नक्षलवादी मिलिंद तेलतुंबडे याचाही समावेश असल्याचे समजत आहे.aware of reports about the death of a top Naxal commander along with 25 others in an anti-Naxal operation in Gadchiroli today
यासंदर्भात महाराष्ट्राचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी नक्षलवाद्यांची संपूर्ण ओळख पटल्याशिवाय नावे जाहीर करणार नाही, असे म्हटले आहे. एएनआय वृत्तसंस्थेने
याचे ट्विट केले आहे.
नक्षलवादी म्होरक्याची मिलिंद तेलतुंबडेच्या डोक्यावर ५० लाख रुपये इनाम घोषित होते. यावरून त्याचे महत्व लक्षात येते. समाजाच्या काही घटकांमध्ये हिंसक विचारसरणी पेरून नक्षलवादी भरती करण्यात त्याचा मोठा हात होता. मिलिंद तेलतुंबडेच्या एन्काऊंटरने नक्षलवाद्यांना खूप मोठा झटका बसला आहे.
मिलिंद तेलतुंबडे कुख्यात शहरी नक्षलवादी आनंद तेलतुंबडे याचा भाऊ आहे. आनंद तेलतुंबडे एल्गार परिषद केस मध्ये UAPA कायद्या अंतर्गत तुरुंगात आहे. त्याच्या सुटकेसाठी काही राजकीय नेते आणि त्याचे शहरी नक्षलवादी साथीदार अनेक प्रयत्न करत असून ते त्यात अद्याप अयशस्वी ठरले आहेत.
मिलिंद तेलतुंबडेची पत्नी अँजेला सोनटक्के उर्फ राही उर्फ इश्कारा उर्फ सविता,उर्फ कविता ही बी.एस्सी.(मायक्रोबायॉलॉजी), एम्एस्सी.(झुऑलॉजी), एम्ए.(सोशॉलॉजी) व बी.एड. अशा शैक्षणिक पदव्या मिळवलेली असून मुंबई विद्यापीठात अभ्यास करत होती. तिला मराठी, हिंदी, इंग्रजी, फ्रेंच, माडिया, गोंडी भाषा उत्तम प्रकारे बोलता येतात. तिच्यावर पोलिसांच्या खुनासाहित अनेक आरोप असून ती सध्या जामिनावर बाहेर आहे.
aware of reports about the death of a top Naxal commander along with 25 others in an anti-Naxal operation in Gadchiroli today
महत्त्वाच्या बातम्या
- मला गुजरातीपेक्षा हिंदी भाषा जास्त आवडते, आपल्याला आपली अधिकृत भाषा मजबूत करण्याची गरज आहे – अमित शहा
- MALIK VS WANKHEDE : …त्या कागदपत्रात नंतर अक्षरे घुसडल्याचे साध्या डोळ्यांनाही दिसतं ; नवाब मलिकांनी सोशल केलेल्या वानखेडेंच्या जन्मदाखल्यावर हायकोर्टाची फटकार
- अमरावती शहरात कलम १४४ लागू , जिल्हाधिकारी पवणीत कौर यांनी दिले जमावबंदीचे आदेश
- Delhi Lockdown:असह्य दिल्ली-परेशान दिल्लीकर! दिल्लीमध्ये प्रदूषणाचा लॉकडाऊन ! नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन…