विशेष प्रतिनिधी
मुंबई : Avinash Jadhav सत्ताधारी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते तथा राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्या खात्यात कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप मनसे नेते अविनाश जाधव यांनी केला आहे. त्यांनी यासंबंधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून या प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली आहे.Avinash Jadhav
मंत्री संजय शिरसाट यांच्यावर गत काही महिन्यांपासून सातत्याने गंभीर आरोप होत आहेत. प्रारंभी ते छत्रपती संभाजीनगर येथील एका हॉटेल प्रकरणात अडचणीत सापडले. त्यानंतर आणखी एका भूखंडाच्या प्रकरणात त्यांचे नाव आले. त्यानंतर आता मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी त्यांच्या खात्यात निधी वितरण, टेंडर प्रक्रिया व मंत्री कार्यालयातील काही अधिकारी अनियमितता व घोटाळा करत असल्याचा आरोप केला आहे. यासंबंधी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे.Avinash Jadhav
मनसेने काय केला आहे आरोप?
अविनाश जाधव यांनी आपल्या पत्रात संजय शिरसाट यांच्या कार्यालयातील खासगी सचिव भरत कदम यांच्यावर गंभीर आरोप केलेत. तसेच विभागात ओएसडी म्हणून काम करणारे सिद्धार्थ भंडारे हे कोणत्याही अधिकृत आदेशाविना कार्यरत असल्याचा संशयही व्यक्त केला आहे. ते आपल्या पत्रात म्हणतात, सामाजिक न्याय विभागात अलीकडील काळात काही गंभीर अनियमितता समोर येत असल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. विशेषतः विविध योजनांमधील निधी वितरण प्रक्रियेत घोळ झाल्याचा आरोप करण्यात येत आहे. विद्यार्थ्यांच्या वसतिगृह व वसतिगृहाशी संबंधित कामांमध्ये ऑनलाईन टेंडर प्रक्रियेच्या नावाखाली आगाऊ रक्कम घेऊन कामांचे वाटप झाल्याच्या तक्रारीही समोर आल्या आहेत.Avinash Jadhav
मंत्रालयातील अधिकारी मंत्री कार्यालयाचा वापर करून काही कामे देताना आमदार, लोकप्रतिनिधी व संबंधित व्यक्तींना टक्केवारीची मागणी करत आहगेत. या सर्व बाबी अत्यंत गंभीर असून, त्याची निष्पक्ष व सखोल चौकशी करण्याची गरज आहे.
सामाजिक न्याय विभागात ओएसडी म्हणून कार्यरत असणारे सिद्धार्थ भंडारे हे कोणत्याही अधिकृत आदेशाविना काम करत असल्याची तक्रारही आमच्याकडे आली आहे. त्यामुळे त्यांच्या नियुक्तीची व अधिकारांची चौकशी करण्यात यावी. या सर्व प्रकरणामुळे सामाजिक न्याय विभागातील प्रशासन व निधी वितरण प्रक्रियेविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. परिणामी, या संपूर्ण प्रकाराची स्वतंत्र व निष्पक्ष चौकशी करण्यात यावी, अशी मागणी मनसेने मुख्यमंत्र्यांकडे आपल्या पत्राद्वारे केली आहे.
रोहित पवारांनीही केले होते गंभीर आरोप
उल्लेखनीय बाब म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी गतवर्षी संजय शिरसाट यांच्यावर सिडकोच्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळात नवी मुंबईतील बिवलकर कुटुंबाला 5 हजार कोटी रुपयांची जमीन 150 एकर जमीन देत मोठा आर्थिक फायदा मिळवून दिल्याचा आरोप केला होता. संजय शिरसाट यांनी सिडकोच्या अध्यक्षपदी विराजमान होताच बिवलकर कुटुंबाला जमीन देण्याच्या आदेशावर स्वाक्षरी केली. मराठा साम्राज्यासोबत गद्दारी करणाऱ्या बिवलकर कुटुंबाला जमीन देऊन त्यांनी स्थानिक भूमिपुत्रांशी गद्दारी केली. त्यांनी इंग्रजांशी हातमिळवणी करणाऱ्या व्यक्तीशी हातमिळवणी केली, असे रोहित पवार म्हणाले होते.
MNS Leader Avinash Jadhav Alleges Multi-Crore Scam in Sanjay Shirsat’s Dept VIDEOS
महत्वाच्या बातम्या
- Anil Ambani : अनिल अंबानींच्या रिलायन्स पॉवरच्या ठिकाणांवर ईडीचा छापा; सकाळ होण्यापूर्वीच १५ पथके पोहोचली
- गॅस पुरवठ्याच्या नियोजनासाठी केंद्र सरकारच्या महत्त्वपूर्ण सूचना; ग्राहकांनी भीती बाळगायचे नाही कारण!!
- Global Alert : इराण युद्धाच्या झळा, तुर्कीवर हल्ल्यानंतर नाटो देश सतर्क, पाकिस्तानवरही युद्धात उतरण्याचा दबाव
- विलीनीकरण होत नाही, तर बात सोडा; सुनेत्रा पवारांची राष्ट्रवादी आतून पोखरा; शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा नवा फंडा!!