विशेष प्रतिनिधी
बुलढाणा : बुलढाण्यात स्वयंचलित हवामान केंद्र सुरु झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना अचूक हवामानाचा अंदाज मिळणे शक्य होणार आहे.
पुणे येथील तंत्रज्ञांच्या पथकाने ३० जून रोजी या स्वयंचलित हवामान केंद्राचे सेंसर्स बसवल्यानंतर हे हवामान केंद्र सतर्क झाले आहे. Automatic weather station Working in Buldhana
गत वर्षापासून ग्रामीण कृषी मौसम सेवा योजनेमधून जिल्हास्तरीय कृषी हवामान केंद्र (दामू) स्थापन झाले आहे. हवामान व त्यातील बदलानुसार शेतकऱ्यांना छोट्यात छोट्या घटकाची माहिती व्हावी,याकरिता कृषी विज्ञान केंद्र, बुलढाणा येथे स्वयंचलित हवामान यंत्रणेची उभारणी पूर्ण झाली. आता याद्वारे हवामानाची आकडेवारी संकलित करण्यात येईल. यामध्ये कमाल व किमान तापमान, सापेक्ष आर्द्रता, वाऱ्याचा तासी वेग व वाऱ्याची दिशा, जमिनीतील ओलावा, जमिनीतील तापमान, सूर्यप्रकाशाचा कालावधी, पर्जन्यमान या सर्व नोंदी सहज उपलब्ध होणार आहेत. यामुळे हवामानाचा अचूक अंदाज देता येईल.
जेणेकरून शेतकऱ्यांना जमिनीच्या मशागतीपासून ते काढणीपर्यंत माहिती मिळण्यास मदत होईल व शेतकऱ्यांना पिकाचे योग्य नियोजन करता येईल.तसेच देशातील १९६ जिल्हे हे हवामान बदलाबाबत संवेदनशील आहेत. त्यामध्ये बुलढाण्याचाही समावेश आहे. दुसरीकडे राज्यात अशा केंद्रांची १० ठिकाणी स्थापना केली असून, प्रायोगिक तत्त्वावर ते कार्यान्वित झाले आहे,अशी माहिती कृषी हवामान शास्रज्ञ मनेश यदूलवार यांनी दिली आहे.
- बुलढाण्यात स्वयंचलित हवामान केंद्र कार्यरत
- केंद्राचे सेंसर्स ३० जून रोजी बसवले
- हवामानाची आकडेवारी संकलित करण्यात येईल
- शेतकऱ्यांना हवामानाचा अंदाज कळणार
- कमाल व किमान तापमान, सापेक्ष आर्द्रता
- वाऱ्याचा तासी वेग व वाऱ्याची दिशा
- जमिनीतील ओलावा, जमिनीतील तापमान
- सूर्यप्रकाशाचा कालावधी, पर्जन्यमान अंदाज
- राज्यात १० ठिकाणी केंद्रे उभारली आहेत