• Download App
    रिक्षा कालव्यात पडून एकजण मयतAuto rikshaw fallen into the canal with three persons,in this accident one person dead

    रिक्षा कालव्यात पडून एकजण मयत….

    डिंभे धरणाला लागून असलेल्या सुपेधर गावा जवळील कालव्यामध्ये रिक्षा पकडून पुण्यातील अनिल भोसले (वय -52) हा व्यक्ती मयत झाला आहे.


    विशेष प्रतिनिधी

    पुणे – डिंभे धरणाला लागून असलेल्या सुपेधर गावा जवळील कालव्यामध्ये रिक्षा पकडून पुण्यातील अनिल भोसले (वय -52) हा व्यक्ती मयत झाला आहे. Auto rikshaw fallen into the canal with three persons,in this accident one person dead

    भोइरवाडी ता. आंबेगाव येथे पुण्यातून अनिल भोसले, प्रकाश लावंड, नितीन सूर्यवंशी हे एम एच 14 5830 ही रिक्षा घेऊन लग्नासाठी पांडुरंग भोईर यांच्याकडे गेले होते. तेथून परत येत असताना या तिघांनी धरणाजवळ थांबून धरणचा, पाण्याचा आनंद घेतला, फोटो काढले व तेथून खाली अवघ्या दोनशे मीटर अंतरावर उताराला गाडीवरचे नियंत्रण सुटून गाडी जवळील कालव्यामध्ये पडली.

    कालव्यातून सध्या 400 कुसेक्स पाणी वाहत असल्याने गाडी पडताच वाहून जाऊ लागली. गाडी कालव्यात पडल्याचे जवळील लोकांना समजताच ग्रामस्थांनी धावपळ केली. त्यांनी प्रकाश लावंड यांना बाहेर काढले तर नितीन सूर्यवंशी हा स्वतः बाहेर निघून आला. मात्र अनिल भोसले यांचा तपास लागला नाही. ग्रामस्थांनी अनिल भोसले यांचा तपास सुरू ठेवला सायंकाळी साडेसहा वाजता कालव्याच्या कडेला त्यांचा मृतदेह मिळून आला. प्रकाश लावड यांच्यावर घोडेगाव रूग्णालयात डॉक्टर शेख यांनी तातडीने प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी मंचर उपजिल्हा रुग्णालयात पाठवले. दारूच्या नशेत असल्यामुळे हा अपघात झाला असावा असा अंदाज काही प्रत्यक्षदर्शींनी व्यक्त केला. ग्रामस्थांनी हा अपघात होताच धावपळ करून अपघातग्रस्तांना मदत करण्याचा प्रयत्न केला.

    Auto rikshaw fallen into the canal with three persons,in this accident one person dead

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    नवीन प्रणालीद्वारे होणार सार्वजनिक तक्रारींचे निवारण

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल