• Download App
    औरंग्याच्या औलादींना सोडणार नाही; देवेंद्र फडणवीसांचा इशारा!!|Aurangya's children will not be spared; Devendra Fadnavis' warning!!

    औरंग्याच्या औलादींना सोडणार नाही; देवेंद्र फडणवीसांचा इशारा!!

    प्रतिनिधी

    नागपूर : महाराष्ट्रात अचानक औरंगजेबाच्या औलादी पैदा झाल्या आहेत. ते कायदा सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न करत आहेत. पण कोणीही कायदा हातात घेऊ नये. सरकार औरंग्याच्या औलादींना अजिबात सोडणार नाही, असा खणखणीत इशारा उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरातून दिला.Aurangya’s children will not be spared; Devendra Fadnavis’ warning!!



    फडणीस म्हणाले :

    • कोल्हापुरात सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे.
    • औरंगजेबाचे उदात्तीकरण झाले तर संताप येणे स्वाभाविक आहे.
    • पण महाराष्ट्र औद्योगिक दृष्ट्या प्रगत राज्य आहे. तिथे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणे योग्य नाही. त्यामुळे कोणी कायदा हातात घेऊ नये. औरंगजेबाचे उदात्तीकरण सरकार सहन करणार नाही. त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल.

    अबू आजमी उतरला औरंग्याच्या समर्थनात; म्हणे, औरंगजेब होता धर्मनिरपेक्ष राजा!!

    दरम्यान, नगरच्या फकीरवाड्यात औरंगजेब नाचवल्यानंतर कोल्हापुरात औरंग्याच्या औलादींनी शिवराज्याभिषेकाच्या दिवशी औरंगजेबाचे मोबाईल स्टेटस ठेवले. त्यानंतर हिंदुत्ववाद्यांचा संताप संपूर्ण महाराष्ट्रभर उसळला असताना मुंबईतून आणखी एक औरंग्याची औलाद त्याच्या समर्थनार्थ उतरली आहे. समाजवादी पार्टीचा आमदार अबू अशी मागणी याने औरंग्याचे समर्थन केले आहे. औरंगजेबाचे समर्थन करताना त्याला धर्मनिरपेक्ष राजा असल्याचे बिरूद बहाल केले आहे.

     या ट्विटमध्ये अबू आजमी म्हणतो :

    मी औरंगजेब रहमतुल्ला अलैहच्या साथीला आहे. त्याचा इतिहास जाणून घेतला तर तुम्हाला हे लक्षात येईल की औरंगजेब धर्मनिरपेक्ष राजा होता. त्याने अफगाणिस्तान पासून बर्मापर्यंत आपले राज्य फैलावले. अनेक हिंदू – मुस्लिम राजांनी सत्तेसाठी वेगवेगळे निर्णय घेतले. पण आज त्याला धार्मिक रंग दिला जात आहे आणि त्यामध्ये गोदी मीडिया कारणीभूत आहे.

    पवार म्हणणार औरंगाबादच!!

    छत्रपती संभाजी नगर मध्ये झालेल्या एका कार्यक्रमात दस्तुरखुद्द शरद पवारांनी आपण छत्रपती संभाजी नगर शहराला त्या नावाने संबोधणार नाही, तर औरंगाबाद नावानेच संबोधणार, असे म्हटले आहे.

    Aurangya’s children will not be spared; Devendra Fadnavis’ warning!!

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस