• Download App
    औरंगाबाद : द फोकस इंडियाचा पहिला 'दुर्गा सन्मान' पुरस्कार सोहळा|Aurangabad: The Focus India's first 'Durga Sanman' award ceremony

    औरंगाबाद : द फोकस इंडियाचा पहिला ‘दुर्गा सन्मान’ पुरस्कार सोहळा

    विशेष प्रतिनिधी

    औरंगाबाद  : स्त्रीशक्तीचा जागर आणि सन्मान करत द फोकस इंडियाने ‘ती’च्या लढ्याला केलेला मानाचा मुजरा म्हणजेच ‘दुर्गा सन्मान’पुरस्कार..हा दुर्गा सन्मान पुरस्कार सोहळा थाटामाटात संपन्न झाला.हा पुरस्कार नाट्य क्षेत्रातील प्रख्यात व्यक्तिमत्व अभिनेते निर्माते प्रशांत दामले यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.Aurangabad: The Focus India’s first ‘Durga Sanman’ award ceremony

    द फोकस इंडियाच्यावतीने देण्यात येणारा हा पहिला दुर्गा सन्मान पुरस्कार स्त्री सक्षमीकरणाचे उज्ज्वल कार्य करणाऱ्या प्रख्यात प्लास्टिक सर्जन डॉ. उज्ज्वला दहिफळे, ख्यातनाम वकील कल्पलता पाटील- भारस्वाडकर आणि औरंगाबाद कॅन्टोन्मेंटच्या वरिष्ठ अधिकारी वैशाली केनेकर यांना प्रदान करण्यात आला .



    द फोकस इंडियाच्या दुर्गा सन्मान पुरस्कार वितरण सोहळ्यात अभिनय सम्राट प्रशांत दामले यांच्या सुरांचा साज चढला .प्रशांत दामलेंसोबत ‘गप्पा-टप्पा’ या विशेष मुलाखत कार्यक्रमात त्यांनी ‘मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं.त्याबरोबरच रंजिश ही सही ही गझल गात प्रेक्षकांना सुखद धक्का दिला..

    यावेळी द फोकस इंडियाच्या वतीने करण्यात आलेल्या विनंतीला मान देत प्रशांत दामले यांच्या सुरांनी उपस्थित सर्व मंत्रमुग्ध झाले. प्रायोजक लालचंद मंगलदास सोनी LMS ज्वेलर्स औरंगाबाद तर सहप्रायोजक कापसे पैठणी येवला यांच्या सहकार्याने हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.या सोहळ्याचे सूत्रसंचालन माधवी अग्रवाल यांनी केले तर प्रेषित रूद्रवार यांनी प्रशांत दामले यांची मुलाखत घेतली.

    Aurangabad: The Focus India’s first ‘Durga Sanman’ award ceremony

     

     

    Related posts

    Nitesh Rane : नीतेश राणेंचा काँग्रेस, मनसेला टोला, म्हणाले- काँग्रेस अन् मनसे एकमेकांचा दर्जा ठरवत आहेत, आपण लांबूनच हसलेले बरे

    Chandrakant Khaire : दोन्ही ठाकरे एकत्र आले तरच मुंबई ताब्यात येईल; चंद्रकांत खैरे यांचे वक्तव्य, बिहार निवडणुकीवरून काँग्रेसला फटकारले

    किशोरी पेडणेकर म्हणाल्या- काँग्रेसने बिहारमधील ऱ्हासातून बोध घ्यावा, स्वबळाचा निर्णय योग्य की अयोग्य लवकरच कळेल