आता पुन्हा सोमवारी २० तारखेपासून औरंगाबाद शहरातील पहिलीपासूनच्या शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.Aurangabad school bell will ring from tomorrow!
विशेष प्रतिनिधी
औरंगाबाद : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दीड वर्षापासून प्राथमिक शाळा बंद होत्या. १ डिसेंबरनंतर शाळा सुरू होईल असे देखील सांगितले गेले होते. परंतु कोव्हीड मुळे पुन्हा शाळा सुरू होणार नाही असे मनपाने स्पष्ट केले होते. त्यानंतर आता पुन्हा सोमवारी २० तारखेपासून औरंगाबाद शहरातील पहिलीपासूनच्या शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
याशिवाय कोविडच्या रुग्णांचा आकडा कमी झाला असला तरी कोविडचे नियम पाळूनच शाळा सुरू कराव्या लागणार आहे.तशा सूचना देखील शाळांना देण्यात आल्या आहेत.
हे असतील नियम
१)शाळा सुरू होताच पहिल्या दिवशीपासून विद्यार्थ्यांना शाळेत मास्क लावूनच प्रवेश दिला जाणार आहे.
२) विद्यार्थ्यांना थर्मल गनद्वारे तपासणी करणे, विद्यार्थ्यांना ताप, सर्दी, खोकला किंवा इतर लक्षणे आढळून आल्यास विद्यार्थ्यांना घरी पाठवून डॉक्टरांकडे जाण्याचा सल्ला दिला जाणार आहे.
३) याशिवाय वर्गात सुरक्षित अंतर ठेवून शाळेतील जागेनुसार विद्यार्थ्यांना बसविण्याची व्यवस्था करावी लागणार आहे.
Aurangabad school bell will ring from tomorrow!
महत्त्वाच्या बातम्या
- अमित शाह यांच्या दौऱ्यावेळी राष्ट्रवादीकडून आंदोलन; बॅनरवर शहा, मोदीच का? ; शिवराय, आंबेडकर यांचे फोटो नसल्याचा संताप
- हिंदू देवी-देवतांचा अवमान करणारा वादग्रस्त कॉमेडियन मुनव्वर फारुकीचा मुंबईत झाला शो, काँग्रेसने दिला होता पाठिंबा
- गुलाबरावांची मंत्रिपदावरून हकालपट्टी कधी होणार? ; चित्रा वाघ यांनी उपस्थित केला सवाल
- आत्मनिर्भर भारतासाठी सहकार क्षेत्र मोलाचे, सहकार विद्यापीठ, महाविद्यालयांची स्थापनाही करणार; अमित शाह यांची पुण्यात घोषणा