• Download App
    औरंगाबाद की संभाजीनगर? : नामांतराच्या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान, शिंदे सरकारने केले होते छत्रपती संभाजीनगर|Aurangabad or Sambhajinagar? Chhatrapati Sambhajinagar Renaming challenged In Mumbai High Court

    औरंगाबाद की संभाजीनगर? : नामांतराच्या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान, शिंदे सरकारने केले होते छत्रपती संभाजीनगर

    प्रतिनिधी

    औरंगाबाद : औरंगाबाद शहराचे नामांतर प्रथम अल्पमतात असलेल्या सरकारने केले. त्यानंतरही पुन्हा दोन मंत्री असलेल्या सरकारने छत्रपती संभाजीनगर केले. शहरातील सामाजिक ऐक्य टिकवण्यासाठी नुकतेच शिंदे-फडणवीस सरकारने केलेले नामांतर रद्द करण्यात यावे. शहराचे नाव पूर्ववत औरंगाबाद कायम ठेवावे. यासंबंधी सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय अंतिम समजावा, अशा आशयाची याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल करण्यात आली आहे.Aurangabad or Sambhajinagar? Chhatrapati Sambhajinagar Renaming challenged In Mumbai High Court

    मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्या. कर्णिक यांनी यावर १ ऑगस्टला सुनावणी ठेवली आहे.

    औरंगाबाद महापालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगराध्यक्ष तथा प्रदेश उपाध्यक्ष मुश्ताक अहमद, अण्णा खंदारे आणि राजेश मोरे यांनी हे आव्हान दिले आहे. उद्धव ठाकरे यांचे अल्पमतातील सरकार असल्याने निर्णय टिकणार नसल्याने नव्याने दोन मंत्री असलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नामांतराचाउर्वरित. निर्णय घेतला. हा निर्णय रद्द करावा, या सरकारला तो अधिकार नसल्याचे याचिकेत म्हटले आहे.



    घटनेत नमूद केल्याप्रमाणे किमान बारा मंत्री असल्याशिवाय घेतलेला ठराव ग्राह्य धरण्यात येणार नाही. औरंगाबाद ऐतिहासिक शहर आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाचे पर्यटन स्थळ आहे. हिंदू मुस्लिमांचे ऐक्य आहे. राज्यशासनाने १९९५ मध्ये शहराचे नाव बदलले होते. तेव्हा यालाही आव्हान देण्यात आले होते.

    तेव्हा सर्वोच्च न्यायालयानेही स्थगिती दिली होती. औरंगाबाद शहराच्या नामांतरापेक्षा उद्योग तसेच बेरोजगारी हे विषय महत्त्वाचे असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले होते. एकदा सर्वोच्च न्यायालयाने एखाद्या विषयासंबंधी निर्णय दिल्यानंतर तो अंतिम समजण्यात यावा, असा युक्तिवाद याचिकेत करण्यात आला.

    Aurangabad or Sambhajinagar? Chhatrapati Sambhajinagar Renaming challenged In Mumbai High Court

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस