दरम्यान मागील तीन दिवसांमध्ये या पथकाने शहरात १९००० नागरिकांची तपासणी केली त्यामध्ये ८१ जणांनी लस घेतली नसल्याचे निदर्शनास आले.Aurangabad Municipal Corporation has levied a fine of Rs 40,000 on citizens who walk on the streets without getting vaccinated
विशेष प्रतिनिधी
औरंगाबाद : महानगरपालिकेच्या वतीने नागरी मित्र पथकातर्फे लस न घेतलेल्या नागरिकांचा शोध घेण्यात येत आहे.दरम्यान मकबरा पाहण्यासाठी आलेल्या पर्यटकांचा सिद्धार्थ उद्यानातील स्थानिक पर्यटकांचेही प्रमाणपत्र तपासण्यात आले आहे.
दरम्यान मागील तीन दिवसांमध्ये या पथकाने शहरात १९००० नागरिकांची तपासणी केली त्यामध्ये ८१ जणांनी लस घेतली नसल्याचे निदर्शनास आले.दरम्यान प्रत्येकी ५०० रुपये दंड याप्रमाणे महानगरपालिकेच्या नागरी मित्र पथकाने तब्बल ४० हजार ५०० रुपये दंडाची रक्कम वसूल केली आहे.
लस व्यतिरिक्त येवढा दंड केला वसूल
याशिवाय कचरा जास्त आढळून आल्या बद्दल १४ जणांकडून २२०० रुपये, जूना मोंढा येथील वैभव लक्ष्मी ट्रान्सपोर्ट येथे प्रतिबंधित २७० किलो कॅरीबॅग आढळून आल्याने २५,००० रुपये दंड आकारण्यात आला आहे. बांधकाम साहित्य रस्त्यावर टाकणाऱ्या चार जणांकडूनही ११ हजार रुपये दंड मनपाच्या नागरी मित्र पथकाने वसूल केला आहे.
Aurangabad Municipal Corporation has levied a fine of Rs 40,000 on citizens who walk on the streets without getting vaccinated
महत्त्वाच्या बातम्या
- पंजाब मध्ये भाजप – कॅप्टन अमरिंदरसिंग – सुखदेव सिंह धिंडसा यांच्या त्रिपक्षीय युतीचा समान जाहीरनामा
- मुंबई -आग्रा महामार्गावर भाजपचे ठिय्या आंदोलन; शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर आक्रमक भूमिका
- WATCH : तरुण स्पोर्ट बाईकऐवजी चक्क घोड्यावर स्वार पेट्रोलचा परवडत नाही, वडिलांकडून मुलाला घोडा
- Chandigarh MNC Election Results : चंदिगड महापालिकेत ‘आप’ची बल्ले बल्ले, पहिल्यांदाच १४ वॉर्ड जिंकले, भाजपला १२ जागा, काँग्रेसकडे ८, तर अकाली दलाकडे १ जागा