• Download App
    औरंगाबाद : ५०० ते २००० रुपयांपर्यंत मिळतय लसीकरणाचे बनावट प्रमाणपत्र ; ४०० पेक्षा जास्त बोगस प्रमाणपत्र दिलेAurangabad: Fake certificate of vaccination for Rs.500 to Rs.2000; Issued more than 400 bogus certificates

    औरंगाबाद : ५०० ते २००० रुपयांपर्यंत मिळतय लसीकरणाचे बनावट प्रमाणपत्र ; ४०० पेक्षा जास्त बोगस प्रमाणपत्र दिले

    या मधील सर्वात आश्चर्यकारक बाब म्हणजे घाटी रुग्णालयातील डॉ. रझीउद्दीन या टोळीचे मास्टरमाइंड असल्याचे समोर आले आहे.Aurangabad: Fake certificate of vaccination for Rs.500 to Rs.2000; Issued more than 400 bogus certificates


    विशेष प्रतिनिधी

    औरंगाबाद : औरंगाबाद शहरात अजूनही ७० हजार नागरिकांनी दुसरा डोस घेतलेला नाही.महानगरपालिका आपले लसीकरणाचे उद्दीष्ट पूर्ण करू शकलेली नाही.त्यामुळे शहरात बनावट प्रमाणपत्र देणारी टोळी सक्रिय झाल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान जिन्सी पोलिसांनी लसीकरणाचे बनावट प्रमाणपत्र देणाऱ्या तीन जणांना अटक केली.

    या मधील सर्वात आश्चर्यकारक बाब म्हणजे घाटी रुग्णालयातील डॉ. रझीउद्दीन या टोळीचे मास्टरमाइंड असल्याचे समोर आले आहे.अटक केलेल्यांमध्ये डॉ. शेख रझीउद्दीन फहीमुद्दीन, डॉ. शेख मोहीउद्दीन शेख फहीमुद्दीन, अबु बकर अल हमीद हादी अल हमीद आणि मोहम्मद मुदस्सीर मोहम्मद अश्पाक यांचा समावेश आहे.



    तर सिस्टर आढाव, शहेनाज शेख सरकारी कागदपत्रांवर लस घेतल्याच्या खोट्या नोंदीवरून बनावट प्रमाणपत्र तयार करत असल्याचे उघड झाले आहे.लसीकरणाचे बनावट प्रमाणपत्र हे शहरात ५०० ते २ हजार रुपयांपर्यंत मिळत आहे. पोलिसांनी पकडलेल्या या तिघांनी आतापर्यंत शहरात ४०० पेक्षा जास्त बोगस प्रमाणपत्र दिल्याचे उघड झाले आहे.

    ओमायक्रोन या विषयाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनातर्फे लसीकरणाचे काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आले आहे. जिल्हा प्रशासनाने लसीकरण न झालेल्यांवर विविध प्रकारचे बंधने लादली. त्यामुळे बोगस प्रमाणपत्रांचा सुळसुळाटच निर्माण झाल्याचे पाहायला मिळत आहे.

    Aurangabad: Fake certificate of vaccination for Rs.500 to Rs.2000; Issued more than 400 bogus certificates

    Related posts

    Maharashtra : राज्यातील कामगार कायद्यांमध्ये सुधारणा करुन महाराष्ट्र कामगार संहिता नियम तयार होणार!

    Savitribai Phule memorial नायगावात सावित्रीबाई फुले स्मारकासाठी 142.60 कोटी रुपये मंजूर; फडणवीस सरकारचा निर्णय!!

    त्यावेळी राज की उद्धव?, प्रश्नावर पवारांचे उत्तर “ठाकरे कुटुंबीय”; पण आता दोन्ही भावांच्या ऐक्यावर मात्र कानावर हात!!