औरंगाबादमध्ये बावीस इंची धारदार तलवार घेऊन हर्षद रोहिदास गोरमे या तरुणाने जुना मोंढा परिसरामध्ये वाढदिवसाचा केक कापला होता. Aurangabad: Birthday boy arrested by police
विशेष प्रतिनिधी
औरंगाबाद : लोक नवीन काय करतील याचा पत्ताच लागत नाही. आता एक नवीनच क्रेझ आली आहे,ती म्हणजे वाढदिवसासाठी तलवारीने केक कापणे. परंतु ही तलवारीने केक कापण्याची क्रेझ लोकांच्या चांगलीच अंगलट येते. अशीच एक घटना काल औरंगाबाद मध्ये घडली आहे.
औरंगाबादमध्ये बावीस इंची धारदार तलवार घेऊन हर्षद रोहिदास गोरमे या तरुणाने जुना मोंढा परिसरामध्ये वाढदिवसाचा केक कापला होता.त्याने तलवारीने केक कटिंग करतानाचा व्हिडीओ तरुणाने स्टेटसवर ठेवला होता.
हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी आरोपींचा शोध घेऊन त्याला अटक केली आहे. या प्रकरणी शस्त्रबंदी कायद्यानुसार आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. तलवारीने केक कापून बर्थडे सेलिब्रेट करणं तरुणाच्या अंगलट आलं आहे. हा सर्व प्रकार औरंगाबाद शहरातील जुना मोंढा परिसरात घडला.
Aurangabad : Birthday boy arrested by police
महत्त्वाच्या बातम्या
- KASHI : १३ डिसेंबरला काशी विश्वनाथ कॉरिडॉरचे उद्घाटन ; काशी विश्वेश्वर मंदिर-राणी अहिल्यादेवी होळकरांचं योगदान-पंतप्रधान मोदींचा ड्रीम प्रोजेक्ट …
- RT-PCR : आरटीपीसीआर टेस्टसाठी आता ३५० रुपये आकारणार ; इतर चाचण्यांचे दरही निश्चित..
- पंजाबात क़ॉंग्रेसचा वचपा काढण्यासाठी कॅप्टन अमरिंदर सिंग पुन्हा नव्या जोमाने रिंगणात
- वयाच्या सत्तरीतही गुडघ्याला बांधले बाशिंग, जाहिरातीनंतर इच्छुक वधुंच्या प्रस्तावाचा पाऊस
- रशिया व युक्रेनच्या फौजा आमनेसामने, युद्धाच्या भितीने समस्त युरोपला ग्रासले
- महाराष्ट्रातील सहकारी बॅँकेवर रिझर्व्ह बॅँकेची कारवाई, १० हजारांपेक्षा जास्त रक्कम काढता येणार नाही