• Download App
    ४०० लिटर डिझेल चाेरी प्रकरणी तिघांवर गुन्हा दाखलAundh area Dmart robbery of ४०० liter Disesl , police registered crime against three accused

    ४०० लिटर डिझेल चाेरी प्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल

    पेट्राेल, डिझेलचे दर दिवसेंदिवस वाढत असल्याने नागरिकांना महागाईचे चटके बसू लागले असून वाहनांचे इंधनावर अतिरिक्त खर्च सहन करावा लागत आहे. अशापरिस्थितीत औंध येथील डी-मार्टच्या परिसरात ठेवण्यात आलेले ३८ हजार ५०० रुपये किंमतीचे ४०० लिटर डिझेल चाेरी करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.


    विशेष प्रतिनिधी

    पुणे -पेट्राेल, डिझेलचे दर दिवसेंदिवस वाढत असल्याने नागरिकांना महागाईचे चटके बसू लागले असून वाहनांचे इंधनावर अतिरिक्त खर्च सहन करावा लागत आहे. अशापरिस्थितीत औंध येथील डी-मार्टच्या परिसरात ठेवण्यात आलेले ३८ हजार ५०० रुपये किंमतीचे ४०० लिटर डिझेल चाेरी करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी तीनजणांवर पाेलीसांनी डिझेल चाेरीचा गुन्हा दाखल करत एकास अटक केली आहे. Aundh area Dmart robbery of ४०० liter Disesl , police registered crime against three accused



    चतृश्रृंगी पाेलीस ठाण्याच्या हद्दीत औंध परिसरात नागरस राेड येथे डीमार्ट (अव्हेन्यु सुपरमार्ट) आहे. सदर ठिकाणी डिजीटल जनरेटर रुमच्या बाजूस उघडया जागेत ३८ हजार रुपये किंमतीचे ४०० लिटर डिझेल आणून ठेवण्यात आले हाेते. परंतु सदर डिझेल चाेरी करुन ते चढया दराने विक्री करण्याचे उद्देशाने डीमार्ट मध्ये नाेकरी करणाऱ्या तीन इसमांनी डिझेल चाेरी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

    याप्रकरणी पाेलीसांनी अरविंद अर्जुन माळी(२२), याेगेश प्रकाश वाघमाडे (२५) व निलेश राजेश चाैधरी (२४) यांचेवर गुन्हा दाखल करत आराेपी अरविंद माळी यास अटक केली आहे. सदर आराेपी डिझेल चाेरी करतानाचे सीसीटीव्ही फुटेज पाेलीसांना प्राप्त झाले असून त्याआधारे पुढील तपास चतृश्रृंगी पाेलीस करत असल्याची माहिती वरिष्ठ पाेलीस निरीक्षक राजकुमार वाघचवरे यांनी दिली आहे.

    Aundh area Dmart robbery of ४०० liter Disesl , police registered crime against three accused

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    त्यावेळी राज की उद्धव?, प्रश्नावर पवारांचे उत्तर “ठाकरे कुटुंबीय”; पण आता दोन्ही भावांच्या ऐक्यावर मात्र कानावर हात!!

    NCP and Shiva Sena राष्ट्रवादीने पोस्टर वरती चढवून ठेवले “भावी मुख्यमंत्री”; तशीच ठाकरे बंधूंनी मारली पोस्टर वरती मिठी!!

    Sharad Pawar NCP : पवारांच्या पक्षाची अवस्था चव्हाण + रेड्डी काँग्रेस सारखी; त्यांच्या राष्ट्रवादीच्या गळतीतून अजितदादांच्या राष्ट्रवादीची भरती!!