कॉलेज विद्यार्थ्यांच्या वयोगटाच्या लसीकरणाची मोहीम वेगाने सुरू आहे .शालेय विद्यार्थ्यांच्या सगळ्या वयोगटाला अजून लसीकरणाची परवानगी देखील मिळालेली नाही. Atul Bhatkhalkar sharply criticized the decision of Thackeray government to start school from Monday, said – is the government in the right place?
विशेष प्रतिनिधी
मुंबई : राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. राजेश टोपे यांनी पालक आणि शाळा व्यवस्थापनाशी चर्चा केल्यानंतर शाळा सुरु करण्यासंदर्भात निर्णय झाला आहे. मात्र, लसींचे डोस घेतलेल्याना शाळेत जात येणार आहे, असे म्हंटले आहे.दरम्यान सोमवारपासून शाळा सुरु करण्याचा निर्णय ठाकरे सरकारच्यावतीने काल घेण्यात आला. यावरून भाजप नेते अतुल भातखळकर यांनी आरोग्यमंत्री डॉ. राजेश टोपे आणि ठाकरे सरकावर निशाणा साधला आहे.
शालेय विद्यार्थ्यांच्या सगळ्या वयोगटाला अजून लसीकरणाची परवानगी देखील मिळालेली नाही. तर ते दोन डोस घेतील कसे? या सरकारचे डोके ठिकाणावर आहे का?, असा सवाल भातखळकर यांनी विचारला आहे.
भातखळकर यांनी ट्विटमध्ये म्हंटले आहे की, ‘कॉलेज विद्यार्थ्यांच्या वयोगटाच्या लसीकरणाची मोहीम वेगाने सुरू आहे .शालेय विद्यार्थ्यांच्या सगळ्या वयोगटाला अजून लसीकरणाची परवानगी देखील मिळालेली नाही.तर ते दोन डोस घेतील कसे? या सरकारचे डोके ठिकाणावर आहे का?, असा सवाल भातखळकर यांनी केला आहे.
Atul Bhatkhalkar sharply criticized the decision of Thackeray government to start school from Monday, said – is the government in the right place?
महत्त्वाच्या बातम्या
- पुणे : स्वाधार योजनेच्या लाभासाठी पात्र विद्यार्थ्यांना अर्ज भरण्यास 28 फेब्रुवाीपर्यंत मुदतवाढ
- दिल्लीतील मोजक्या कुटुंबांसाठीच पूर्वी देशात नवी बांधकामे झाली, पंतप्रधानांची नाव न घेता गांधी कुटुंबावर टीका
- कितना चंदा जेबमें आया म्हणत जुन्या सहकाऱ्यानेच केला केजरीवालांचा भांडाफोड, गैरकृत्ये प्रकाशात आणण्यासाठी काढली वेब सिरीज