• Download App
    माघशुध्द एकादशीनिमित्त श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरात आकर्षक नयनरम्य फुलांची आरास । Attractive flower arrangement at Sri Vitthal Rukmini Temple on the occasion of Maghshuddha Ekadashi

    माघशुध्द एकादशीनिमित्त श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरात आकर्षक नयनरम्य फुलांची आरास

    विशेष प्रतिनिधी

    पंढरपूर : माघशुध्द एकादशीनिमित्त श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरात आकर्षक नयनरम्य अशी फुलांची आरास करण्यात आली. श्री.विठ्ठल रूक्मिणी मंदिर समितीच्या वतीने श्री.विठ्ठल रूक्मिणीमातेच्या गाभाऱ्यात तसेच मंदिरात आकर्षक व नयनरम्य अशी फुलाची आरास केली आहे… Attractive flower arrangement at Sri Vitthal Rukmini Temple on the occasion of Maghshuddha Ekadashi



    माघवारी सोहळ्यासाठी राज्याच्या विविध भागातून भाविक आज पंढरीत दाखल झाले असून कार्तिक नंतर निर्बंध शिथील असणारी माघीवारी दुसरीच यात्रा होय. पंढरीत भाविकांची गर्दी वाढली असून श्री विठ्ठल रूक्मिणी मातेच्या दर्शनासाठी चार दर्शनमंडप उभारले आहेत सध्या दर्शन रांग दोन किलोमीटर पर्यंत पोहचली आहे. श्री विठ्ठल रूक्मिणी दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना मास्क सक्तीचे असणार आहे.

    मंदिराचे प्रवेशद्वार, सोळखांबी, सभामंडपसह देवाचा गाभारा आकर्षक फुलांनी सजवण्यात आला असून सावळ्या विठु रूखमायचे रूप पाहून भाविक आनंदी आनंद होत आहे.

    Attractive flower arrangement at Sri Vitthal Rukmini Temple on the occasion of Maghshuddha Ekadashi

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    उद्धव ठाकरेंना सत्तेच्या ऑफरची फडणवीसांची खेळी; ठाकरे बंधूंच्या ऐक्यात आणि उरल्या सुरल्या महाविकास आघाडीत पाचर मारून ठेवली!!

    ठाकरे – आंबेडकर युतीची घोषणा कागदावरून देखील गायब; शिंदे सेना – आनंदराज आंबेडकरांची युतीची घोषणा; महायुतीची बेरीज की वजाबाकी??

    Shinde Shiv Sena : एकनाथ शिंदे- आनंदराज आंबेडकरांच्या पक्षाची युती; उद्या अधिकृत घोषणेची शक्यता; मनपा-जि.प. निवडणुका लक्ष्य