भारत विकासाच्या मार्गावर जात असताना हिंदू समाज स्वत्वाला समजू शकू नये यासाठी भारताचा इतिहास, व्यवस्था, वर्तमानावर निंदा करून देशाबाबत अश्रद्धा निर्माण करण्याचे काही घटक प्रयत्न करत आहेत. प्राचीन मूल्यांवर हल्ला होतो. निंदा केली जाते व सूक्ष्म माध्यमातून सांस्कृतिक आक्रमण करण्याचा प्रयत्न होतो. अशा लोकांनी आता हातमिळवणी देखील केली आहे, असा हल्लाबोल सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केला. Attempts to create distrust in the country by criticizing history, system and present, handshake for cultural aggression, attack of Sarsanghchalak
विशेष प्रतिनिधी
नागपूर : भारत विकासाच्या मार्गावर जात असताना हिंदू समाज स्वत्वाला समजू शकू नये यासाठी भारताचा इतिहास, व्यवस्था, वर्तमानावर निंदा करून देशाबाबत अश्रद्धा निर्माण करण्याचे काही घटक प्रयत्न करत आहेत. प्राचीन मूल्यांवर हल्ला होतो. निंदा केली जाते व सूक्ष्म माध्यमातून सांस्कृतिक आक्रमण करण्याचा प्रयत्न होतो. अशा लोकांनी आता हातमिळवणी देखील केली आहे, असा हल्लाबोल सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केला. नागपूर येथे आयोजित दसरा मेळाव्यात सरसंघचालक मार्गदर्शन करत होते. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आदी यावेळी उपस्थित होते.
स्वातंत्र्य भेदरहित समाजातूनच टिकू शकतो. सनातन काळापासून एकात्मता ही भारताची शक्ती आहे, असे सांगून डॉ. भागवत म्हणाले, सूक्ष्म माध्यमातून सांस्कृतिक आक्रमण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या लोकांनी आता हातमिळावणीदेखील केली आहे, भारतातही असे अनेक जण आहे. देशातीलच दोन राज्यांतील पोलीस एकमेकांशी युद्ध करतात हे अयोग्य आहे. आपण एकाच देशाचे नागरिक आहोत मग असले प्रकार का याचा विचार केला पाहिजे. संविधानाअंतर्गत आपण सर्वच एकाच देशाचे आहोत. संघराज्य ( फेडरल) व्यवस्था फेडरलअसली तरी लोक फेडरल नाही. सत्तेत बसलेल्या लोकांकडून पोषक व्यवहार होत नाही, मग समाजाला दिशा कशी मिळणार? राजकारणातील स्वार्थासाठी काही लोक कपट करतात. असंतोष निर्माण करण्याचे प्रयत्न होतात. जाती, प्रदेश, भाषेच्या माध्यमातून देशात अराजकता उत्पन्न करण्याचे प्रयत्न होतात. तंत्रज्ञानाचा आधार घेत आगीत तेल ओतण्याचे काम होतो.
सरसंघचालक म्हणाले, ओटीटीवर कसे कसे चित्रपट येतात. आता तर मुलांच्या हातीदेखील मोबाईल आले आहे. ओटीटीवर नियंत्रण नाही. देशात अमली पदार्थाचे जाळे वाढत आहे. त्यावर नियंत्रण नाही. त्यातून येणाऱ्या पैशांतून देशविरोधी कारवाया होतात. बिटकॉईनवर कोणत्या राष्ट्राचे नियंत्रण आहे. समाजहितासाठी या बाबींना नियंत्रित करण्याचे काम शासनाला करावेच लागेल.
घरातूनच बालकांवर संस्कार होतात, तेथून त्यांचे मन तयार होतात. तेथून त्यांच्यात विवेक जागृत होतो. कुटुंब प्रबोधनातूनच मुलांच्या मनावर नियंत्रण आणले जाऊ शकतो. स्वभाषा, वेशभूषा, संस्कार, भजन, भोजन हे स्वत्वाच्या ज्ञानातूनच येऊ शकते. यासाठी कुटुंबांमध्ये चर्चा व्हाया हवी.
कोरोना विरुद्धच्या लढाईत भारताने उत्तम कामगिरी केल्याचे सांगून सरसंघचालक म्हणाले, कोरोनामुळे अनेक तरुण गेले. लोकांनी एकत्रित येत कोरोनाचा सामना व प्रतिकार केला.
तिसऱ्या लाटेसाठीदेखील प्रतिकार सुरू आहे. ही लाट येणार नाही असे वाटते. जर आलीच तर परिणामकारक राहणार नाही. प्रत्येक गावात पाच ते सात कोरोनायोद्धा तयार व्हावे यासाठी संघाने देशपातळीवर प्रशिक्षण दिले आहे. देश नक्कीच कोरोनाला मात देईल. कोरोनामुळे आर्थिक क्षेत्रात नुकसान झाले आहे. परंतु लोकांमध्ये आर्थिक नुकसान भरून काढण्याचा आत्मविश्वास आहे. अनेक खर्च आपण उगाच करतो. कोरोनात कमी पैशांत विवाह झाले. कोरोना जायच्या मार्गावर आहे. सुधारलेल्या सवयी परत बिघडवू नका. पर्यावरण, आरोग्य यावर भर द्यायला हवा. सर्व प्रकारच्या पॅथींना मान्यता मिळाली पाहिजे. पॅथीचा अहंकार असायला नको. मतभेद असावेत परंतु विरोध नको. सर्व आरोग्य पदधतींचा समन्वय साधत सर्वसमावेशक उपचारपद्धती तयार व्हावी. गावपातळीवर आरोग्यरक्षकांची व्यवस्था बनावी. सर्वांना सुलभ व स्वस्त आरोग्याची सुविधा निर्माण व्हावी.
Attempts to create distrust in the country by criticizing history, system and present, handshake for cultural aggression, attack of Sarsanghchalak
महत्त्वाच्या बातम्या
- फेसबुकची ‘सीक्रेट ब्लॅकलिस्ट’ लीक, भारतातील ‘या’ 10 धोकादायक संस्था आणि लोकांची नावेही समाविष्ट
- Cruise Drugs Case : आर्यन खान 20 ऑक्टोबरपर्यंत तुरुंगातच राहणार, न्यायालयाने जामिनावरील निकाल राखून ठेवला
- बांग्लादेशात दुर्गापूजा मंडपात कट्टरतावाद्यांकडून तोडफोड, देवीच्या मूर्तीची विटंबना, अफवांमुळे उसळला हिंसाचार
- नवाब मलिक म्हणाले, हे लोक तंबाखू आणि गांजामध्ये फरक करू शकत नाहीत, NCB ने जावयाच्या जामिनाविरोधात उच्च न्यायालय गाठले