पालघर जिल्ह्यातील नायगाव पूर्व येथील गणेशनगरात ७ वर्षीय मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी मौलानाला अटक करण्यात आली आहे. मुलीच्या तक्रारीनंतर स्थानिक लोकांनी मौलानाचे कपडे फाडले आणि अनेक किलोमीटर धिंडही काढली. यादरम्यान आरोपीला मारहाणही करण्यात आली आहे. बेदम मारहाण केल्यानंतर आरोपीला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. मौलानाविरुद्ध आयपीसी आणि पॉक्सो कायद्याच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.Attempt to molest 7-year-old girl in Palghar, accused of angry mob beat Maulana, tore clothes
प्रतिनिधी
पालघर : पालघर जिल्ह्यातील नायगाव पूर्व येथील गणेशनगरात ७ वर्षीय मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी मौलानाला अटक करण्यात आली आहे. मुलीच्या तक्रारीनंतर स्थानिक लोकांनी मौलानाचे कपडे फाडले आणि अनेक किलोमीटर धिंडही काढली. यादरम्यान आरोपीला मारहाणही करण्यात आली आहे. बेदम मारहाण केल्यानंतर आरोपीला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. मौलानाविरुद्ध आयपीसी आणि पॉक्सो कायद्याच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नुरुल हसन असे आरोपी मौलानाचे नाव आहे. रविवारी संध्याकाळी ही घटना घडली असून त्याचा व्हिडिओ आज समोर आला आहे. पीडिता घरी जात असताना आरोपीने तिच्याशी अभद्र वर्तन केल्याचा आरोप आहे.
मुलीला बळजबरी पळवून नेत होता आरोपी
आरोपी मौलाना पीडितेला बळजबरीने सोबत नेण्याचा प्रयत्न करत होता, त्यादरम्यान मुलीने आरडाओरड केली आणि घटना उजेडात आली. यानंतर स्थानिक लोकांनी प्रथम बालिकेला मौलानाच्या तावडीतून सोडवले, त्यानंतर आरोपीला बेदम मारहाण करून पोलिसांच्या ताब्यात दिले.
Attempt to molest 7-year-old girl in Palghar, accused of angry mob beat Maulana, tore clothes
महत्त्वाच्या बातम्या
- Modi – Patole : पंतप्रधान मोदींच्या विरोधात नाना पटोलेंचा आक्षेपार्ह वक्तव्ये; कारवाईचे दिलीप वळसेंचे आश्वासन!!
- जेसीबी खोदकामात भूमिगत वीजवाहिनी तुटल्याने 25 हजार ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित
- जेसीबीच्या खोदकामात वीजवाहिनी तोडल्याने धायरी परिसरात वीज खंडित
- काँग्रेसचे मंत्री वर्षा गायकवाड, अस्लम शेख यांना तलवार नाचवणे पडले महागात; गुन्हा दाखल!!