विशेष प्रतिनिधी
मुंबई: भाजपाच्या एका नेत्याची माझ्याकडेही तक्रार आली होती. पण मी त्याची जाहीर वाच्यता केली नाही. तुमच्या सहकाऱ्याची तक्रार आली आहे, त्याची सत्यता पडताळा असं मी देवेंद्र फडणवीसांना सांगितलं होते, असे सांगत त्यांना धमकाविण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे.Attempt to intimidate Devendra Fadnavis in the name of anonymous leader, Sharad Pawar says BJP leader’s complaint was also received to me
माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आपल्या घणाघाती आरोपांनी महाविकास आघाडीला जेरीस आणत आहेत. याच पार्श्वभूमीवर त्यांना धमकाविण्याचा प्रयत्न शरद पवार यांनी केला आहे. पत्रकार परिषदेत बोलताना पवार म्हणाले, एखादी व्यक्ती किंवा लोकप्रतिनिधी सार्वजनिक जीवनात कार्यरत असेल तर शहानिशा न करता त्यावर बोलणं योग्य नसते.
- आम्ही खासगीत आमच्या बायकांशीही बोलायचे नाही का? देवेंद्र फडणवीस यांच्या आरोपावर अनिल गोटे यांचा सवाल
म्हणून मी फडणवीसांकडे ही तक्रार दिली होती. त्यावर फडणवीसांकडून तुम्ही सांगितलेल्या तक्रारीत मी लक्ष घातलं आहे. या पुढे असं होणार नाही याची काळजी घेऊ असं मला कळवले गेले.शरद पवार यांनी भाजपच्या कोणत्याही नेत्याचं नाव घेतले नसले तरी भाजपचा हा नेता कोण? याबाबतचे तर्कवितर्क लढवले जात आहेत.
काल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत मोठा गौप्यस्फोट केला होता. गिरीश महाजन यांच्याविरोधात सरकारी वकीलच कसा कट रचत आहे याची माहिती फडणवीस यांनी दिली होती. त्यावर शरद पवार यांनी मीडियाशी बोलताना प्रतिक्रिया व्यक्त केली.