• Download App
    शरद पवार यांच्या घरावरील हल्ला अजिबात समर्थनीय नाही, एसटी कर्मचाऱ्यांच्या व्यथा , मागण्या योग्यप्रकारे व योग्य व्यासपीठावरच मांडल्या जाव्यात आणि त्या ऐकून घेतल्या जाव्या, देवेंद्र फडणवीस यांचे वक्तव्य|Attack on Sharad Pawar's house is not justifiable, Statement of Devendra Fadnavis

    शरद पवार यांच्या घरावरील हल्ला अजिबात समर्थनीय नाही, एसटी कर्मचाऱ्यांच्या व्यथा , मागण्या योग्यप्रकारे व योग्य व्यासपीठावरच मांडल्या जाव्यात आणि त्या ऐकून घेतल्या जाव्या, देवेंद्र फडणवीस यांचे वक्तव्य

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरावरील हल्ला हा अजिबात समर्थनीय नाही. मी या घटनेचा तीव्र निषेध करतो, असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. मात्र, पाच महिन्यांपासून आंदोलन करत असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या व्यथा , मागण्या योग्यप्रकारे व योग्य व्यासपीठावरच मांडल्या जाव्यात आणि त्या ऐकून घेतल्या जाव्या, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे.Attack on Sharad Pawar’s house is not justifiable, Statement of Devendra Fadnavis

    शरद पवार यांच्या घरावर हल्ला केला. दगडफेक आणि चप्पलफेक केली. यावरदेवेंद्र फडणवीस यांनी दोन ट्विट केले आहेत. त्यात म्हटले आहे की, ज्येष्ठ नेते शरद पवार साहेब यांच्या निवासस्थानी झालेली घटना सर्वथा चुकीची आहे. नेते कुठल्याही पक्षाचे असोत, घरांवर अशी आंदोलने अजीबात समर्थनीय नाहीत. मी या घटनेचा तीव्र निषेध करतो. दुसऱ्या ट्विटमध्ये त्यांनी एसटी कर्मचाऱ्यांचे म्हणणे ऐकण्याचे आवाहन केले.



    गेल्या 5 महिन्यांहून अधिक काळपासून एसटी कर्मचारी आंदोलन करीत आहेत. त्यांच्या व्यथा, मागण्या योग्यप्रकारे व योग्य व्यासपीठावरच मांडल्या जाव्यात आणि त्या ऐकून घेतल्या जाव्या, अशी अपेक्षाही या निमित्ताने व्यक्त करतो, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

    भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे की, राजकीय नेत्यांच्या घरी जाऊन कुटुंबीय वेठीस धरले जातील असं आंदोलन करणं आपली परंपरा नाही. त्यामुळे शरद पवारजी यांच्या घरी जाऊन आंदोलकांनी रोष व्यक्त करणं चुकीचंच. मात्र, त्यांच्या रोषाची दखल मविआ सरकारनं आता तरी घ्यावी, अशी अपेक्षाही या निमित्तानं व्यक्त करतो.

    भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी एसटी कर्मचाऱ्यांनी शरद पवार यांच्या घरावर हल्ला करणे योग्य नव्हते. महाराष्ट्राच्या इतिहासात आतापर्यंतच्या अशी घटना झालेली नाही, असे म्हटलं. तर राष्ट्रवादीचे नेते धनजंय मुंडे यांनी राज्यातील कोणतेही आंदोलन कधी नेत्यांच्या घरापर्यंत गेले नाही. एसटी कर्मचाऱ्यांना जे मिळाले ते पवारांच्या मध्यस्थीमुळे मिळाले आहे. हा हल्ला पुर्वनियोजित आहे. कुणाच्या तरी सांगण्यावरून ठरवून हे आंदोलन करण्यात आले आहे. असा आरोप धनजय मुंडे यांनी केला आहे.

    Attack on Sharad Pawar’s house is not justifiable, Statement of Devendra Fadnavis

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस

    Thackeray brothers : म्हणे, ठाकरे बंधू एकत्र, अफाट ताकदीच्या वल्गनांना फुटले पंख!!

    Thakckrey brothers म्हणे, महाराष्ट्राच्या हितासाठी टाळी आणि हाळी; खरंतर ठाकरे बंधूंच्या अस्तित्वासाठी हात मिळवायची तयारी!!