• Download App
    पिंपरी-चिंचवडमध्ये गणपतीच्या विसर्जनावेळी दोन जण बुडाले; एकाचा मृतदेह बाहेर काढला। At the time of immersion of Ganapati in Pimpri-Chinchwad Two drowned; The body of one was taken out

    पिंपरी-चिंचवडमध्ये गणपतीच्या विसर्जनावेळी दोन जण बुडाले; एकाचा मृतदेह बाहेर काढला

    वृत्तसंस्था

    पुणे : पिंपरी-चिंचवडमध्ये गणपती विसर्जनासाठी गेलेले दोन तरुण इंद्रायणी नदीमध्ये बुडाले असून एकाचा मृतदेह शोधण्यात अग्निशमन दलाला यश आले. At the time of immersion of Ganapati in Pimpri-Chinchwad Two drowned; The body of one was taken out

    ही घटना रविवारी सायंकाळी आहे. एकाचा शोध सुरू आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक यशवंत गवारे यांनी दिली आहे.दत्ता ठोंबरे (वय २०) आणि प्रज्वल काळे (वय १८) अशी त्या तरुणांची नाव आहेत. यापैकी, प्रज्वल काळे याचा मृतदेह नदी बाहेर काढला आहे.दत्ता ठोंबरे आणि प्रज्वल काळे कुटुंबासह आळंदी रस्त्यावरील इंद्रायणी नदीमध्ये गणपती विसर्जनासाठी गेले होते. कुटुंबातील काही सदस्य हे नदी काठावर उभे होते.



    दरम्यान, दत्ता आणि प्रज्वल यांच्यासह गणपती विसर्जन करण्यासाठी नितीन ठोंबरे, शिवाजी ठोंबरे हे पाण्यात उतरले होते. दत्ता आणि प्रज्वल यांनी गणपती बाप्पांचे पात्रात जाऊन विसर्जन केले. तेव्हा, दोघांना पाण्याचा अंदाज आला नाही. ते बुडायला लागले, दोघांनाहि पोहता येत नव्हते. त्या दोघांना वाचवण्यासाठी नितीन आणि शिवाजी यांनी प्रयत्न केले. परंतु, ते अपयशी ठरले.

    भोसरी एमआयडीसी पोलिस आणि अग्निशमन दलाला याबाबत कळविले. प्रज्वलचा मृतदेह बाहेर काढण्यात अग्निशमन कर्मचाऱ्यांना यश आले. तर, दत्ता ठोंबरे याचा शोध सुरू आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

    At the time of immersion of Ganapati in Pimpri-Chinchwad Two drowned; The body of one was taken out

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस