अचानक मुख्यमंत्र्यांनी पाहणी केल्यामुळे कर्मचाऱ्यांची एकच तारांबळ उडाली.हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी स्वत: येऊन विधानभवनाची पाहणी केली.At night, Chief Minister Uddhav Thackeray suddenly reached the Vidhan Bhavan; Preliminary preparations for the winter session
विशेष प्रतिनिधी
मुंबई : काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मानेच्या दुखण्यावरील उपचारासाठी एच. एन. रिलायन्स रुग्णालयात दाखल झाले होते. यावेळी त्यांच्यावर सर्व्हाइकल स्पाईन शस्त्रक्रिया करण्यात आली होती.त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे कोणत्याही कार्यक्रमाला हजर राहू शकले नाही.
पण काल रात्री ८ वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मंत्री अनिल परब यांच्यासह अचानक विधान भवनात पोहोचले होते.अचानक मुख्यमंत्र्यांनी पाहणी केल्यामुळे कर्मचाऱ्यांची एकच तारांबळ उडाली.हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी स्वत: येऊन विधानभवनाची पाहणी केली.
विधान भवनातील विधानसभा आणि विधान परीषदेच्या दोन्ही सभागृहात जाऊन त्यांनी तिथल्या पूर्व तयारीची पाहणी केली. अशी माहिती सूत्रांनी दिली.त्याच बरोबर त्यांनी अधिवेशन काळात विधान भवनात कुठेही चालण्याचा त्रास होऊ नये म्हणून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार चालण्याचा सरावही केला.
At night, Chief Minister Uddhav Thackeray suddenly reached the Vidhan Bhavan; Preliminary preparations for the winter session
महत्त्वाच्या बातम्या