विशेष प्रतिनिधी
मुंबई : मुंबईतील बोरवली पश्चिम येथील जॉगर्स पार्कमध्ये प्रेमी युगल अश्लील चाळे करत असल्याचे पाहून सोसायटीने चक्क ‘ नो किसिंग झोन’ चे फलक लावले आहेत.
मुंबईतील बोरवलीतील हा विभाग हाय प्रोफाईल म्हणून ओळखला जातो.
या विभागांमध्ये एक मोठी गार्डन (जॉगर्स पार्क ) बनवली आहे. तिथे काही जोडपी बसतात तर काही अश्लील चाळे करतात. त्यामुळे महिला लहान मुले तसेच वयस्कर यांना त्रास होत आहे. त्यामुळे सोसायटीने तिथे फलक लावले आहेत. त्यावर नो किसिंग झोन, असे लिहिले आहे. सध्या हा फलक चर्चेचा विषय बनला आहे.
- बोरवलीमध्ये जॉगर्स पार्कमध्ये ‘नो किसिंग झोन’
- हाय प्रोफाईल विभाग म्हणून ओळखला जातो
- अश्लील चाळ्यांचा रहिवाशांना त्रास
- सोसायटीने तिथे फलक लावले
- फलक बनले परिसरात चर्चेचा विषय