विशेष प्रतिनिधी
नंदुरबार : पुरग्रस्तासाठी सरकारने पॅकेज जाहीर केले आहे. पण, ते जनतेपर्यंत पोचले तर खरे. नुसत्या घोषणा काही कामाच्या नाहीत, तातडीची मदत अजून मिळाली नाही, अशी खरमरीत टीका भाजपचे नेते आशिष शेलार यांनी ठाकरे- पवार सरकारवर केली.Assistance to flood victims True package when delivered : aashish shelar
मंत्री नवाब मलिक काही तरी बोलायचं म्हणून बोलतात.सरकार काम करत नसल्याने राज्यपाल यांना हस्तक्षेप करावा लागत आहे. परंतु राज्यपाल नियमात राहून काम करत आहेत.
विमानतळाचे हस्तांतरण राज्य सरकारने केलं आणि आंदोलन ही शिवसेनाच करत आहे. विमानतळ हस्तांतरण करताना अटी शर्ती का टाकल्या नाहीत.राज्य सरकार आणि उद्योगपती अदानी यांची मिलीभगत आहे. टक्केवारीसाठी आंदोलन झाल्याचा आरोप आशिष शेलार यांनी केला.
संजय राऊत यांच्या पंतप्रधान चहा पाण्याला बोलवत बोलवत नाहीत, या वक्तव्यावर आशिष शेलार यांनी टीका केली. चहा पाण्यावर जनतेचे प्रश्न सुटत नाहीत. आंदोलन जनतेत जाऊन करायची असतात चहापाण्यासाठी नाही, असा टोला त्यांनी लगावला.
- पॅकेज पूरग्रस्त जनतेपर्यंत पोचेल तेव्हा खरे
- पूरग्रस्त तातडीच्या मदतीच्या अजून प्रतीक्षेत
- सरकार निष्क्रिय त्यामुळे राज्यपाल यांचा हस्तक्षेप
- शिवसेनेचे विमानतळ आंदोलन टक्केवारीसाठी
- विमानतळाचे हस्तांतरण राज्य सरकारने केलं
- राज्य सरकार, उद्योगपती अदानी यांची मिलीभगत
- चहा पाण्यावर जनतेचे प्रश्न सुटत नाहीत, संजय राऊत यांना टोला
- आंदोलन जनतेत जाऊन करायची असतात
Assistance to flood victims True package when delivered : aashish shelar