प्रतिनिधी
मुंबई : काँग्रेसचे वरिष्ठ नेते खासदार राहुल गांधी हे राजीव गांधी यांचे पुत्र आहेत याचा पुरावा आम्ही कधी मागितला का?, असा वादग्रस्त सवाल करणाऱ्या मुख्यमंत्री हेमंत विश्वशर्मा यांच्यावर काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष नाना पटोले भडकले आहेत.Assam Chief Minister Vishwasharma’s mental balance deteriorated
हेमंत विश्वकर्मा यांचे मानसिक संतुलन बिघडले आहे. त्यांना चांगल्या मानसोपचार तज्ञाच्या उपचाराची गरज आहे. तो त्यांनी लवकरात लवकर करून घ्यावा. या उपचाराचा खर्च काँग्रेस पक्ष करेल, असा टोला नाना पटोले यांनी लगावला आहे.
काय म्हणाले होते हेमंत विश्वशर्मा?
राहुल गांधी हे राजीव गांधी यांचे पुत्र आहेत याचा पुरावा आम्ही कधी मागितला का?, असा सवाल हेमंत विश्वशर्मा यांनी केला होता. खासदार राहुल गांधी यांच्याबाबत एक वादग्रस्त विधान केल्याने काँग्रेस आणि भाजपमध्ये वाकयुद्ध भडकले आहे.
हेमंता विश्वशर्मा हे उत्तराखंड विधानसभा निवडणुकीच्या प्रचार दौऱ्यावर आहेत. त्यांनी आज एका प्रचारसभेत सर्जिकल स्ट्राइकचा मुद्दा उपस्थित करत राहुल गांधी यांना लक्ष्य केले. ते म्हणाले, बिपीन रावत यांच्या नेतृत्वाखाली भारताने पाकिस्तानवर सर्जिकल स्ट्राइक केला. मग राहुल गांधी यांनी त्याचा पुरावा मागितला. लष्कराच्या कारवाईचेही तुम्हाला पुरावे कशासाठी लागतात? पाकिस्तानात घुसून आम्ही बॉम्बस्फोट घडवले असे लष्कर म्हणत असेल तर त्यांनी ते फोडलेच असे म्हणावे लागेल. त्यावर शंका घेऊन करून वाद निर्माण करण्याचे कोणतेही कारण नाही. तो वादाचा मुद्दाच होऊ शकत नाही. राहुल गांधी हे राजीव गांधी यांचे पुत्र आहेत याचा पुरावा आम्ही कधी मागितला का?
विश्वशर्मा म्हणाले, की जनरल रावत यांना काँग्रेसचे नेते “सडक का गुंडा” म्हणाले होते आणि आता तेच लोक त्यांच्या नावाने उत्तराखंडमध्ये मते मागत आहेत. किती हा ढोंगीपणा? कर्नाटकातील हिजाब वादावरही ते बोलले. शिक्षण सोडून हिजाबचा वाद उगाचच निर्माण करण्यात आला आहे. यामागे काँग्रेसचे व्होटबँकेचे राजकारण चालले असून काँग्रेसला एकदा नाही पुन्हा पुन्हा हरवले पाहिजे.
हेमंत विश्वशर्मा यांच्या याच भाषणामुळे नाना पटोले यांनी भडकून त्यांच्यावर मानसिक संतुलन बिघडल्याचे टीका केली आहे. वाटेल तसे बेछूट आरोप करून दुसऱ्याचे चारित्र्यहनन करणे ही भाजपची संस्कृती आहे. काँग्रेसची संस्कृती इतरांना पुढे नेण्याची आहे. हेमंत विश्वशर्मा यांनी आपल्यावर लवकरात लवकर उपचार करून घ्यावेत. ते लवकर बरे व्हावेत यासाठी त्यांच्या उपचाराचा खर्च काँग्रेस पक्ष करेल, असा टोलाही नाना पटोले यांनी लगावला आहे.
Assam Chief Minister Vishwasharma’s mental balance deteriorated
महत्त्वाच्या बातम्या
- कोरोनाविरोधी लसीच्या सक्तीला तीव्र विरोध; कॅनडात ट्रकचालकांचे चक्क जाम आंदोलन
- ब्रिटिश संशोधकांची कमाल, प्रतिसुर्याची निर्मिती; अखंड आणि हरित उर्जानिर्मितीचा प्रयोग सफल
- नाशिकहून सुरतला पोहोचा अवघ्या सव्वा तासांत; नितीन गडकरी यांच्याकडून महामार्गाबाबत माहिती
- हिजाब वादाची पाकिस्तानी लिंक : सिख फॉर जस्टिसच्या मदतीने आयएसआयकडून अराजकतेसाठी प्रयत्न, आयबीने जारी केला अलर्ट