भरघोस आर्थिक मदत करत केली कृतज्ञता व्यक्त.
विशेष प्रतिनिधी
पुणे : गेली तीनं दशक मराठी चित्रपट विश्वावर अधिराज्य गाजवणारे, आपल्या विनोदी शैली च्या जोरावर महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचलेले, मराठी चित्रपट विश्वाला ब्लॉकबस्टर सुपरहिट चित्रपट देणारे अष्टपैलू अभिनेते अशोक सराफ यांनी नुकतीच गेल्या वर्षी त्यांच्या वयाची 75 वर्ष पूर्ण केली. त्यासाठी लाभलेल्या प्रायोजकत्व निधीचा विनियोग रंगमंच तंत्रज्ञ, कलावंत अशा वयोवृद्ध कलाकारांचा त्यांच्या योगदानाबद्दल कृतज्ञतासन्मान करण्यासाठी करावा, अशी इच्छा अशोक आणि निवेदित सराफ यांनी व्यक्त केली. अखेर ही इच्छा अशोक सराफ यांनी पूर्ण केलीय. Ashok Saraf News
कृतज्ञ मी… कृतार्थ मी’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून अशोक सराफ यांच्या वतीने पडद्यामागील कलाकारांना प्रत्येकी ७५ रुपयांचा धनादेश देण्यात आला.
दादर इथल्या स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहातं हा कार्यक्रम रंगला.या कार्यक्रमात पडद्यामागील २० कलाकारांचा सन्मान करण्यात आला. अशोक सराफ यांच्याकडून या कलाकारांना प्रत्येकी ७५ हजार रुपये देण्यात आले. याशिवाय अमेरिकेत राहणारे संजय पैठणकर यांनीही १० लाखांची मदत केली .
या कार्यक्रमातं उपेंद्र दाते (अभिनेते),बाबा (सुरेश) पार्सेकर (नेपथ्यकार-प्रकाशयोजनाकार),अर्चना नाईक (अभिनेत्री),वसंत अवसरीकर (अभिनेते),दीप्ती भोगले (गायिका-अभिनेत्री),नंदलाल रेळे (ध्वनिसंयोजक),अरुण होर्णेकर (दिग्दर्शक-निर्माते),प्रकाश बुद्धिसागर (दिग्दर्शक),पुष्पा पागधरे (पार्श्वगायिका),वसंत इंगळे (अभिनेते),सुरेंद्र दातार (संयोजक-निर्माते),किरण पोत्रेकर (लेखक-दिग्दर्शक),शिवाजी नेहरकर (लोकनाट्य कलावंत),हरीश करदेकर (नाट्यकलावंत),सीताराम कुंभार (नेपथ्य व्यवस्थापक),विष्णू जाधव (नेपथ्य साहाय्यक),एकनाथ तळगावकर (नेपथ्य सहायक),रवींद्र नाटळकर (नेपथ्य सहायक),विद्या पटवर्धन (अभिनेत्री),उल्हास सुर्वे (नेपथ्य सहायक) या सर्व कलाकारांचा सन्मान करण्यात आला.कृतज्ञ मी… कृतार्थ मी’ कार्यक्रम‘कृतज्ञ मी… कृतार्थ मी’ या कार्यक्रमात मराठी नाट्यपरंपरेचे मूळ असलेल्या संगीत नाटकांबद्दल कृतज्ञता नाट्यपदे गाण्यात आली. मानसी फडके-केळकर व श्रीरंग भावे यांनी ती सादर केली.
Ashok Saraf News
महत्वाच्या बातम्या
- पाकिस्तानात राजकीय पक्षाच्या अधिवेशनात आत्मघाती स्फोट; 44 हून अधिक लोक मरण पावले, 100 जखमी
- ‘’…म्हणूनच उद्धव ठाकरेंना नाट्यगृहात एकपात्री प्रयोग करावा लागला’’ बावनकुळेंनी लगावला टोला!
- IIT मुंबईच्या वसतिगृहाच्या कँटीनमधील पोस्टरवरून वाद; लिहिले- इथे फक्त शाकाहारी लोकांना बसण्याची परवानगी
- संसदेत आज ‘I-N-D-I-A’ची परीक्षा, दिल्ली सेवा विधेयक संमत होण्यापासून विरोधक रोखू शकतील का?