• Download App
    ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांचा 'महाराष्ट्र भूषण' पुरस्काराने गौरव; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा Ashok Saraf felicitated with 'Maharashtra Bhushan' award

    ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांचा ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्काराने गौरव; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : आपल्या अष्टपैलू अभिनयाच्या जोरावर अवघ्या सिनेसृष्टीवर अधिराज्य गाजवणारे ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना 2023 चा मानाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी यासंबंधीची घोषणा केली. त्यांनी स्वतः अशोक सराफ यांना फोन करून त्यांचे अभिनंदन केले. मराठी सिनेसृष्टीत अशोक सराफ यांचे नाव खूप आदराने घेतले जाते. त्यांचे मराठी रंगभूमीतही महत्त्वपूर्ण योगदान आहे. Ashok Saraf felicitated with ‘Maharashtra Bhushan’ award

    अशोक सराफ यांनी केवळ विनोदीच नव्हे तर गंभीर स्वरुपापासून ते खलनायकी प्रवृत्तीपर्यंत विविध छटांचे दर्शन आपल्या अभिनयातून घडवून रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अशोक सराफ यांचे अभिनंदन करताना म्हटले आहे.

    1969 पासून सिनेसृष्टीत काम करण्यास सुरुवात

    अशोक सराफ यांचा जन्म 4 जून 1947 रोजी झाला. त्यांनी 1969 पासून सिनेसृष्टीत काम करण्यास सुरुवात केली. प्रारंभीच्या काळात त्यांनी मराठी चित्रपटांमध्ये काम केले. 1969 मध्ये त्यांनी जानकी नावाचा चित्रपट केला.

    250 हून अधिक चित्रपटांत काम

    अशोक सराफ यांनी अनेक नाटकांमध्येही मामांनी काम केले. ‘लगीनघाई’ , ‘मनोमिलन’, ‘संगीत संशय कल्लोळ’ ही त्यांची काही गाजलेली नाटके आहेत. अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे, सचिन पिळगांवकर व महेश कोठारे हे समीकरण आलटून पालटून लोकांच्या समोर यायचे. त्यातल्या त्यात मामा आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांची मैत्री विशेष फुलली. तेच त्यांच्या अभिनयातही दिसून यायचे. सचिन पिळगावकर तर मामांचे लहान बंधूच बनले. या सर्वांनी मिळून केलेले चित्रपट लोकांना प्रचंड आवडले. ‘अशी हि बनवा बनावी’, ‘आयत्या घरात घरोबा’, ‘धूम धडाका’ असे अनेक चित्रपट त्यांनी केले. अशोक सराफ यांनी ‘करण अर्जुन’, कोयला, येस बॉस, ‘सिंघम’ आदी अनेक हिंदी चित्रपटांमध्येही काम केले. अशोक सराफ यांनी मराठी व हिंदी अशा जवळपास 250 चित्रपटांत काम केले. यामुळे मराठी सिनेसृष्टीतील ते सम्राट अशोक म्हणूनही ओळखले जातात.


    जेष्ठ अभिनेते अशोक सराफ यांचं पडद्यामागील कलाकारांसाठी मोठा पाऊल,


    महाराष्ट्र सरकारखेरीज “महाराष्ट्र भूषण पुरस्कार” याच नावाचा पुरस्कार देणाऱ्या आणखी काही संस्था आहेत. उदा. OBC-NT या राजकीय पक्षाने अनिलकुमार पालीवाल यांना महाराष्ट्रभूषण हा पुरस्कार दिला आहे. डॉ. मोहन चव्हाण यांना २१ डिसेंबर २०१४ रोजी महात्मा कबीर समता परिषदेतर्फे महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यात आला.
    महाराष्ट्र टाइम्स या वृत्तपत्राने त्यांचा ‘महाराष्ट्र भूषण पुरस्कार’ २०१९ मध्ये शिल्पकार राम सुतार यांना प्रदान केला होता. पनवेल वेल्फेअर सोशल क्लबतर्फे युवा कलावंताला दिला जाणारा ‘महाराष्ट्र भूषण पुरस्कार’ युवा तबलावादक अविनाश पाटील यांना दिला.

    महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित व्यक्तिमत्त्वे

    १९९६- पु. ल. देशपांडे- साहित्य
    १९९७- लता मंगेशकर- कला, संगीत
    १९९९- विजय भटकर- विज्ञान
    २०००- सुनील गावसकर- क्रीडा
    २००१- सचिन तेंडुलकर- क्रीडा
    २००२- भीमसेन जोशी- कला, संगीत
    २००३- अभय बंग आणि राणी बंग- समाजसेवा व आरोग्यसेवा
    २००४- बाबा आमटे- समाज सेवा
    २००५- रघुनाथ माशेलकर- विज्ञान
    २००६- रतन टाटा- उद्योग
    २००७- रा. कृ. पाटील- समाजसेवा
    २००८- नानासाहेब धर्माधिकारी- समाजसेवा
    २००८- मंगेश पाडगावकर- साहित्य
    २००९- सुलोचना लाटकर- कला, सिनेमा
    २०१०- जयंत नारळीकर- विज्ञान
    २०११- अनिल काकोडकर- विज्ञान
    २०१५- बाबासाहेब पुरंदरे- साहित्य
    २०२१- आशा भोसले- कला, संगीत
    २०२३- अप्पासाहेब धर्माधिकारी- समाजसेवा

    Ashok Saraf felicitated with ‘Maharashtra Bhushan’ award

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Savitribai Phule memorial नायगावात सावित्रीबाई फुले स्मारकासाठी 142.60 कोटी रुपये मंजूर; फडणवीस सरकारचा निर्णय!!

    त्यावेळी राज की उद्धव?, प्रश्नावर पवारांचे उत्तर “ठाकरे कुटुंबीय”; पण आता दोन्ही भावांच्या ऐक्यावर मात्र कानावर हात!!

    NCP and Shiva Sena राष्ट्रवादीने पोस्टर वरती चढवून ठेवले “भावी मुख्यमंत्री”; तशीच ठाकरे बंधूंनी मारली पोस्टर वरती मिठी!!