विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : भाजपने अखेरीस महाराष्ट्रात राज्यसभेचे उमेदवार जाहीर केले आहेत. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण त्याचबरोबर पक्षाशी निष्ठावंत माजी आमदार मेधा कुलकर्णी यांची राज्यसभेवर वर्णी लावली आहे. यातून पक्षातले इनकमिंग आणि निष्ठावंत यांचा भाजपने मेळ साधला आहे. Ashok Chavan, Medha Kulkarni nominated to Rajya Sabha
अशोक चव्हाण यांनी काल काँग्रेस सोडताना त्यांच्या आमदारकीचा राजीनामा दिला होताच. त्याचवेळी त्यांना भाजप राज्यसभेची उमेदवारी देऊन केंद्रात केंद्रीय राजकारणात त्यांची पुनर्स्थापना करणार असे सूचित होतच होते. त्यानुसार भाजपने आज त्यांची राज्यसभेची उमेदवारी जाहीर करून त्यांना केंद्रीय राजकारणात सामावून घेतले.
त्याचबरोबर पक्षाच्या महिला मोर्चाच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष कोथरूडच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी यांना राज्यसभेची उमेदवारी देऊन पक्ष निष्ठावंतांना डावलत नाही, असाही संदेश दिला. डॉ. अजित गोपछडे यांना महाराष्ट्रातून तिसरी उमेदवारी भाजपने जाहीर केली आहे.
त्याचबरोबर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, गोविंदभाई ढोकलिया, मयंक नायक आणि जशवंतसिंह परमार यांना गुजरात मधून राज्यसभेवर पाठवण्याचे निश्चित केले आहे.
भाजप व्यापक भूमिका घेऊन पक्षात येणाऱ्या ज्येष्ठ नेत्यांबरोबरच निष्ठावंत नेत्यांनाही वेगवेगळ्या स्तरांवर सामावून घेतो, असा संदेश राज्यसभेच्या या यादीतून दिला आहे.
Ashok Chavan, Medha Kulkarni nominated to Rajya Sabha
महत्वाच्या बातम्या
- जयंत चौधरी यांच्या पक्षाची एनडीएला साथ, यूपीमध्ये इंडिया आघाडीला मोठा धक्का
- तृणमूल काँग्रेसच्या नेत्यावर लैंगिक छळ आणि जमीन बळकावल्याचा आरोप; राज्यपाल म्हणाले – हा भयंकर आणि धक्कादायक प्रकार
- पाकिस्तानच्या निवडणुका अवैध घोषित करण्यासाठी सुप्रीम कोर्टात याचिका; काळजीवाहू पंतप्रधानांनी दिले स्पष्टीकरण
- महाराष्ट्रातील जिल्हा रुग्णालयांच्या कायाकल्पासाठी आशियायी बँकेचे 4000 कोटींचे कर्ज मंजूर; पहिल्या टप्प्यात 1200 कोटी मिळणार!!