• Download App
    ‘’आता उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि संजय राऊत अतिक अहमदच्या मृत्यूवर काय छाती बडवणार?’’ आशिष शेलारांचा टोला! Ashish Shelars response to Sanjay Rauts criticism of Uttar Pradesh government over Atiq Ahmeds death

    ‘’आता उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि संजय राऊत अतिक अहमदच्या मृत्यूवर काय छाती बडवणार?’’ आशिष शेलारांचा टोला!

    संजय राऊत आणि त्यांची शिवेसेना हे मगरीचे खोटे अश्रू ढाळत आहेत, असंही म्हणाले आहेत.

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : उत्तर प्रदेशमधील माफिया अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ या दोघांची पोलिसांच्या ताब्यात असताना, काल रात्री प्रयागराजमध्ये पत्रकारांच्या वेशात आलेल्या तीन जणांना गोळ्या झाडून हत्या केली. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. तर विरोधी पक्षांनी या मुद्दयावरून योगी सरकारवर टीका टिप्पणी सुरू केली आहे. शिवाय उत्तर प्रदेशमधील कायदा-सुव्यवस्थेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहे. इकडे महाराष्ट्रातही ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी यावर अशाच प्रकारे प्रतिक्रिया दिली. त्यावर आता भाजपाकडून त्यांना प्रत्युत्तर दिलं जात आहे. Ashish Shelars response to Sanjay Rauts criticism of Uttar Pradesh government over Atiq Ahmeds death


    आमच ठरलं!!! मुंबई महापालिकेत महायुतीचे १५० पेक्षा जास्त नगरसेवक निवडून आणणार – आशिष शेलार


    भाजपा आमदार आशिष शेलार म्हणाले, ‘’उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांची शिवसेना…हे आता अतिक अहमदच्या मुलाचं एन्काउंटर झालं उत्तर प्रदेशात पण हे मुंबईत धाराशाही पडत आहेत. यांचा तिथल्या गोष्टींशी काय संबंध? अतिक अहमदवर जो हल्ला झाला, त्याच्यावर चौकशी समिती बसली, त्या आरोपींना पकडल्या गेलं, परंतु संजय राऊत आणि त्यांची शिवेसेना हे मगरीचे खोटे अश्रू ढाळत आहेत. आता उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि संजय राऊत अतिक अहमदच्या मृत्यूवर काय छाती बडवणार? सार्वजनिक रुदालीचा कार्यक्रम करणार? ‘’

    याशिवाय ‘’उत्तरप्रदेशचे सरकार कायदा-सुव्यवस्था योग्यप्रकारे हाताळत आहे. कायदा, सुव्यवस्थेवर प्रश्न निर्माण करण्याचा अधिकार उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांना आहे का? त्यांच्या कार्यकाळात तर पोलिसाच्या मागेच पोलीस लागत होते, चोरांच्या मागे पोलीस नाही. जेव्हा त्यांचे सरकार होते तेव्हा पोलीसच कुणाच्या घरासमोर जाऊन स्फोटकं लावत होती. त्यामुळे त्यांना कायदा, सुव्यवस्थेवर बोलण्याचा अधिकार नाही. अतिक अहमदच्या हल्ल्यानंतर सार्वजनिक रुदालीचा कार्यक्रम उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांनी करावा, असं आमचं म्हणणं आहे.’’ असंही शेलार यांनी म्हटलं आहे.

    याचबरोबर ‘’महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार होते, उध्दव ठाकरे मुख्यमंत्री होते तेव्हा मनसुख हिरेनची हत्या झाली. तो तर निर्दोष तरूण होता. त्यावेळेस चिडीचूप असणारे आता मात्र उत्तर प्रदेशमध्ये झालेल्या अट्टल गुन्हेगार अतिक अहमदच्या हत्येवरून उप्र पोलिसांवर, योगींजीवर टीका करत आहेत. दुटप्पीपणा..’’ असं भाजपा प्रवक्ते केशव उपाध्येंनी म्हटलं आहे.

    Ashish Shelars response to Sanjay Rauts criticism of Uttar Pradesh government over Atiq Ahmeds death

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस