• Download App
    ‘’राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काही दिवसांनी टोळीयुद्ध दिसणार’’ आशिष शेलारांचं भाकीत! Ashish Shelars prediction In a few days there will be gang war in the Nationalist Congress

    ‘’राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काही दिवसांनी टोळीयुद्ध दिसणार’’ आशिष शेलारांचं भाकीत!

    ‘’पवारांच्या  राजीनामानाट्याच्या वाकयुद्धानंतर आता राष्ट्रवादीत शीतयुद्ध सुरू’’, असल्याचंही म्हणाले आहेत.

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : भाजपा नेत आमदार आशिष शेलार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधील घडत असलेल्या घडमोडींच्या पार्श्वभूमीवर प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देताना, एक राजकीय भाकीत केलं आहे. शिवाय, राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजपावर होत  असलेल्या टीकेलाही प्रत्युत्तर दिलं आहे. Ashish Shelars prediction In a few days there will be gang war in the Nationalist Congress

    आशिष शेलार म्हणाले, ‘’ज्या पद्धतीने घटना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घडताय, त्या त्यांच्या अंतर्गत आहेत. खरंतर त्यावर आम्ही भाष्य करावं की नाही हा प्रश्न आहे. पण लांबून बघितल्यावर लक्षात येतं, ज्यावेळी शरद पवारांनी जेव्हा राजीनामा दिला, तेव्हा असलेले अजित पवार आणि बाकीच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांची वाक्य हे राष्ट्रवादीतील वाकयुद्ध होतं, ते वाकयुद्ध संपलं आणि आता वर्धापनदिनानिमित्त ज्या पद्धतीच्या भूमिका समोर येत आहेत. त्या राजीनामानाट्याच्या वाकयुद्धानंतर आता वर्धापनदिनी शीतयुद्ध सुरू झालं आहे. आता काही दिवसांनी टोळीयुद्ध सुद्धा दिसेल.’’

    याचबरोबर, ‘’महाराष्ट्राचं, राष्ट्रवादीचं नेतृत्व कोणी करायचं हे त्यांनी ठरावायचं. पण सगळ्यांसमोर एकमत दिसत नाही. ते एकमत नसणं हे स्वाभाविक आहे, नैसर्गिक आहे. अनैसर्गिकरित्या कोण ते करतय, हे काही काळात समोर दिसेल.  सुप्रिया सुळेंनी अगोदर त्यांच्या पक्षाची चिंता करावी. त्यांच्या पक्षात त्यांना मिळालेलं नवीन स्थान, याखाली सुरुंग तर नाही ना याबाबत त्यांनी चिंता करावी. त्यांना दिलेल्या राज्यांपैकी काही राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस आहे का, हे मायक्रोस्कोप घेऊन शोधालयला फिरावं आणि मग भाजपा आणि देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वावर बोलण्याचा विचार करावा.’’ असं म्हणत शेलार यांनी सुप्रिया सुळे यांच्या टीकेला प्रत्युततर दिलं आहे.

    Ashish Shelars prediction In a few days there will be gang war in the Nationalist Congress

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले- ठाकरे सरकार नसते तर दीड वर्षे आधीच मेट्रो आली असती; मुंबई मेट्रो लाईन-2 सेवेचा शुभारंभ

    Dadar station : महाराष्ट्रात सतर्कता; दादर स्टेशनजवळ स्वामीनारायण मंदिरात पोलिसांकडून मॉक ड्रिल; मुख्यमंत्र्यांची बैठक

    Mumbai Metro ‘मुंबई मेट्रो मार्ग 3, टप्पा 2’ सेवेचा शुभारंभ ; फडणवीसांनी दाखवला हिरवा झेंडा