• Download App
    सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीत भाजपच्या दणदणीत विजयानंतर आशिष शेलार यांचे ट्वीट - आज सिंधुदुर्गात आघाडीचा भोपळो फुटलो...! । Ashish Shelar tweet after BJP resounding victory in Sindhudurg district bank election

    सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीत भाजपच्या दणदणीत विजयानंतर आशिष शेलार यांचे ट्वीट – आज सिंधुदुर्गात आघाडीचा भोपळो फुटलो…!

    अवघ्या राज्याचं लक्ष लागलेल्या सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीत भाजपने 19 पैकी ११ जागा मिळवत दणदणीत विजय मिळवला आहे. तर महाविकास आघाडीला 8 जागांवर समाधान मानावे लागले. 2008 ते 2019 अशी तब्बल ११ वर्षे राणेंच्या ताब्यात असलेली ही बँक 2019 मध्ये शिवसेनेकडे गेली होती. परंतु राणेंनी संपूर्ण ताकद पणाला लावून अखेर जिल्हा बँकेवर भाजपचा झेंडा फडकावला आहे. यानंतर विविध राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. भाजप नेते आशिष शेलार यांनीही ट्वीट करून महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे. Ashish Shelar tweet after BJP resounding victory in Sindhudurg district bank election


    आशिष शेलार यांचे ट्वीट

    आपल्या ट्वीटमध्ये शेलार म्हणतात की, “देवांक सोडल्यान अन् देवचराक धरल्यान आणि विधान परिषदेत एक जागा गमवल्यान्… आज सिंधुदुर्गात आघाडीचा भोपळो फुटलो… नवी मुंबई, ठाणे, मुंबई महापालिका निवडणुकींच्या निकालाची ही नांदी आहे. मा. अमितभाई शाह म्हणाले त्याप्रमाणे हिम्मत असेल तर तिघेही एकत्र समोर लढाईला या आम्ही तयार आहोत!”

    आतापर्यंत जिल्हा बँकेवर महाविकास आघाडीच्या पॅनेलची सत्ता होती. संतोष परब हल्ला प्रकरण आणि प्रचंड आरोप-प्रत्यारोपांनी ही निवडणूक गाजली. शिवसैनिक संतोष परब यांच्यावरील प्राणघातक हल्ल्याप्रकरणी भाजप आमदार नितेश राणे यांच्यावर आरोप झाले. त्यांचा अटकपूर्व जामीन जिल्हा न्यायालयाने फेटाळल्यानंतर ते आता हायकोर्टात अर्ज करणार असल्याचं बोललं जातंय. त्यातच नितेश राणे हे अज्ञातवासात आहेत.

    981 पैकी 968 मतदारांनी केले मतदान

    गुरुवारी झालेल्या निवडणुकीत एकूण 981 पैकी 968 मतदारांनी मतदान केले. याचार्च अर्थ या निवडणुकीत तब्बल 98.67 टक्के मतदान झालंय. या मतदारांमध्ये 115 महिला, तर 853 पुरुषांचा समावेश होता. कणकवली वगळता कुठेही गालबोट लागलं नाही. मतदान प्रकिया ही शांततेत पार पडली.

    जिल्हा बँकेचे विद्यमान अध्यक्ष सतीश सावंत व उपाध्यक्ष पराभूत

    जिल्हा बँकेचे विद्यमान अध्यक्ष सतीश सावंत आणि विठ्ठल देसाई या दोन्ही उमेदवारांना समान मतं पडली. यानंतर ईश्वर चिट्ठी टाकून आलेल्या निकालात सतीश सावंत पराभूत झाले. सतीश सावंत हे जिल्हा बँकेचे विद्यमान चेअरमन होते. गतवर्षी बिनविरोध आलेले सतीश सावंत पराभूत झाल्यानं महाविकास आघाडी जबर हादरा बसला आहे. सावंत पराभूत होताच भाजपकडून जारेदार घोषणाबाजी करण्यात आली. आता कसं वाटतंय गार गार वाटतंय अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या.

    Ashish Shelar tweet after BJP resounding victory in Sindhudurg district bank election

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Gold : सोन्याने नवा विक्रम केला प्रस्थापित, पहिल्यांदाच किंमत ९७ हजारांच्या जवळ पोहोचली

    अविश्वास ठरावाला तोंड देण्यापूर्वीच कर्जत जामखेड मध्ये रोहित पवार समर्थक नगराध्यक्षांचा राजीनामा; रोहित पवारांनी नगरपंचायतीची गमावली सत्ता!!

    Thackeray brothers ठाकरे बंधूंच्या व्हॅलेंटाईन गुलाबाला लांब लांब काटे; दोघांच्या सैनिकांनी फोडले वेगवेगळे फाटे!!