नाशिक : ठाकरे बंधू आणि महाविकास आघाडीने दिली भाजपला संधी; आशिष शेलारांनी वाचली मुस्लिम दुबार मतदारांची यादी!!, असे आज घडले. त्यामुळे Vote chori विरुद्ध Vote jihad असा नवा डाव खेळायला सुरुवात झाली.
ठाकरे बंधू शरद पवार आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांनी मतचोरी विरोधात मुंबईत मोठा मोर्चा काढला. त्यावेळी केलेल्या भाषणामध्ये राज ठाकरे यांनी मोठ्या प्रमाणावर दुबार मतदार आहेत, असा आरोप करून वेगवेगळ्या मतदार संघांमधील यादीच वाचून दाखविली. त्याची कागदपत्रे स्क्रीनवर दाखविली. उद्धव ठाकरे आणि शरद पवार त्याचबरोबर काँग्रेसच्या नेत्यांनी सुद्धा जोरदार भाषणे ठोकली. भाजप मतचोरीमुळेच विधानसभा निवडणूक जिंकू शकला. मतांची चोरी करूनच भाजप आणि त्याच्या मित्र पक्षांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जिंकायच्यात, असा आरोप सगळ्या नेत्यांनी केला. मराठी माध्यमांनी ठाकरे बंधू आणि महाविकास आघाडी यांचा संयुक्त मोर्चा भरपूर गाजविला.
– Vote jihad
पण या संयुक्त मोर्चानेच भाजपला vote jihad चा मुद्दा पुढे आणायची संधी दिली. ती संधी भाजपचे मंत्री आशिष शेलार यांनी उचलून आज पत्रकार परिषद घेतली. त्या पत्रकार परिषदेत त्यांनी 31 मतदारसंघांमधली मुस्लिम दुबार मतदारांची संख्या वाचून दाखवली. आपल्या बहुसंख्य मतदार संघांमधून महाविकास आघाडीचे आमदार निवडून आलेत. त्यामध्ये जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, संदीप क्षीरसागर, आदित्य ठाकरे वगैरेंचा समावेश होता. या सगळ्यांच्या मतदारसंघांमधली मुस्लिम दुबार मतदारांची संख्या आणि ते जेवढ्या मतांच्या फरकाने निवडून आले, या एकमेकांशी जुळतात, असा दावा आशिष शेलार यांनी केला. मुंबईतल्या मुस्लिम बहुल विधानसभा मतदारसंघांमधली आणि लोकसभा मतदारसंघांमध्ये मुस्लिम दुबार मतदारांची संख्या तर 60000 च्या पुढे असल्यास त्यांनी वाचून दाखविले. त्यासाठी त्यांनी वर्षा गायकवाड यांच्या लोकसभा मतदारसंघाचे उदाहरण दिले.
ठाकरे बंधू आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांनी फक्त हिंदू मराठी आणि दलित मतदारांची दुबार यादी वाचून दाखविली होती. त्यांना मुस्लिम दुबार मतदार दिसले नाहीत का??, असा सवाल आशिष शेलार यांनी केला. सर्वांना न्याय देण्याच्या दृष्टीने निवडणूक आयोगाने चालू केलेल्या स्पेशल इंटेन्सिव रिव्ह्यू SIR सगळ्यांनीच पाठिंबा द्यावा असे आवाहन आशिष शेलार यांनी केले.
– पवारांचे नाव नाही घेतले
पण या सगळ्यामध्ये भाजपने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर vote jihad चा मुद्दा पुढे आणून vote chori च्या मुद्याला प्रत्युत्तर द्यायचा प्रयत्न केला. आशिष शेलार यांनी आपल्या पत्रकार परिषदेत टार्गेटवर ठाकरे बंधू ठेवले, पण शरद पवारांचे नाव त्यांनी घेतले नाही. ठाकरे बंधू आणि मविआ म्हणजे महाविकास आघाडी असे बोलून त्यांनी शरद पवारांचे नाव महाविकास आघाडीत गुंडाळून टाकले.
Ashish Shelar read out the list of Muslim repeat voters
महत्वाच्या बातम्या
- 52 वर्षांनी क्रिकेट विश्वचषकावर कोरून नाव, भारतीय महिलांनी रचला इतिहास; ऑस्ट्रेलियाची मक्तेदारी मोडीत!!
- Colonel Sophia : कर्नल सोफिया म्हणाल्या- ऑपरेशन सिंदूर भारताची मल्टी-डोमेन वॉरफेयर क्षमता; युद्ध रणनीती आखण्यात तरुणांची मोठी भूमिका
- काकाला चुलीत घालायला पुतण्या तयार; “पवार संस्कारांची” दिसायची राहिली होती हीच किनार!!
- Darbar : 4 वर्षांनंतर सरकार पुन्हा जम्मूमधून चालेल; श्रीनगरमधून 6 लाख कर्मचारी स्थलांतरित होतील; 3 नोव्हेंबरपासून काम सुरू