• Download App
    ‘’महाराष्ट्र आता रस्त्यावर होर्डिंग लाऊन ‘उबाठा’ला थेट विचारतोय... ‘’ म्हणत आशिष शेलारांचे उद्धव ठाकरेंना थेट सवाल! Ashish Shelar criticizes Uddhav Thackeray challenging him to clarify his position on various issues

    ‘’महाराष्ट्र आता रस्त्यावर होर्डिंग लाऊन ‘उबाठा’ला थेट विचारतोय… ‘’ म्हणत आशिष शेलारांचे उद्धव ठाकरेंना थेट सवाल!

    ‘’…नाही तर लहानपणीचा खेळ.. एवढं एवढं पाणी आणि गोलगोल “गाणी” असं म्हणत टोलाही लगावला आहे.

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : भाजपा नेते आशिष शेलार यांनी शिवसेना(ठाकरे गट) पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. शेलारांनी विविध मुद्य्यांवरून उद्धव ठाकरेंना आपली भूमिका स्पष्ट करण्याचे आव्हान दिले आहे.  Ashish Shelar criticizes Uddhav Thackeray challenging him to clarify his position on various issues

    आशिष  शेलार आपल्या ट्वीटमध्ये म्हणतात, ‘’महाराष्ट्र आता रस्त्यावर होर्डिंग लाऊन ‘उबाठा’ला थेट विचारतोय…  औरंगाबाद की छत्रपती संभाजी महाराज नगर?,  उस्मानाबाद की धाराशिव?,  अहमदनगर की पुण्यश्लोक अहिल्यानगर?,  काँग्रेस की हिंदुत्व?,  कबर की स्मारक? आणि  औरंगजेब की सावरकर?’’

    याचबरोबर, ‘’ शब्दांची कोटी न करता.. मर्द, खंजीर… असले शब्द न वापरता… उबाठा प्रमुखांनी महाराष्ट्राला स्पष्ट शब्दात सांगावे. यापैकी नेमके काय? की दोन्ही? नाही तर लहानपणीचा खेळ.. एवढं एवढं पाणी आणि गोलगोल ‘गाणी’ ‘’ असं म्हणत शेलारांनी टोलाही लगावला आहे.

    याशिवाय, ‘’औरंगजेबाशी आपुलकी जपणाऱ्यांसोबत उद्धव ठाकरे आणि त्यांचा पक्ष आहे, हे स्पष्ट आहे.’’ असंही आशिष शेलार यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं आहे.

    Ashish Shelar criticizes Uddhav Thackeray challenging him to clarify his position on various issues

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Devendra Fadnavis : जगाला हेवा वाटेल असे ‘ज्ञानपीठ’ आळंदी येथे उभारणार – देवेंद्र फडणवीस

    Tapti Mega Recharge : ताप्ती मेगा रिचार्ज प्रकल्पाबाबत महाराष्ट्र-मध्यप्रदेशात ऐतिहासिक करार!

    मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले- ठाकरे सरकार नसते तर दीड वर्षे आधीच मेट्रो आली असती; मुंबई मेट्रो लाईन-2 सेवेचा शुभारंभ