नाशिक : मुंबईमध्ये बेस्ट कामगारांच्या पतपेढीची निवडणूक जिंकल्यानंतर महापालिका निवडणूक जिंकण्यासाठी मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी बेस्टची निवडणूक जिंकणारे शशांक राव यांना आणि ज्यांच्या पॅनलला त्यांनी पराभूत केले, ते प्रसाद लाड या दोघांना स्टार प्रचारक पदाची जबाबदारी दिली. शशांक राव यांनी प्रसाद लाड आणि प्रवीण दरेकर यांच्या पॅनलच्या विरोधात निवडणूक लढवली असली तरी ते मूळात भाजपचेच नेते आहेत. त्यामुळे त्यांच्यावर महापालिकांनी निवडणूक जिंकण्यासाठी स्टार प्रचारक पदाची जबाबदारी देण्यात आली.
शशांक राव यांनी ठाकरे बंधूंच्या ऐक्याचा पहिला पराभव केला. ज्यांच्या पॅनलचे नाव माध्यमांनी चर्चेत देखील ठेवले नव्हते त्या शशांक राव यांचे पॅनेल बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीत 14 जागा जिंकले. त्यामुळे शशांक राव नेमके कोण??, याची चर्चा माध्यमांमध्ये सुरू झाली. त्यांचे वडील शरद राव मुंबईत कामगारांचे नेते होते. त्यांनी बेस्ट कामगार संघटना उभी करून तिच्यावर वर्चस्व निर्माण केले होते. पण शशांक राव यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि तिथून राजकारण सुरू केले. पण बेस्ट कामगार पतपेढीच्या निवडणुकीत त्यांनी स्वतंत्र पॅनल उभे करून निवडणूक जिंकली.
त्यानंतर आशिष शेलार यांनी त्यांना स्टार प्रचारक पदाची स्वतंत्र जबाबदारी दिली. त्याचवेळी त्यांनी प्रसाद लाड यांना देखील स्टार प्रचारक म्हणून जाहीर केले. या राजकीय खेळीतून आशिष शेलार यांनी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजप नेत्यांमधले दुसऱ्या फळीतले political buffer तयार केले. त्यांनी अप्रत्यक्षपणे तसे बोलून दाखवले. आधी आमच्या या दोन शिलेदारांची निपटा. मग नंतर माझ्याशी आणि देवेंद्र फडणवीस यांच्याशी लढायला या, असे आव्हान आशिष शेलार यांनी ठाकरे बंधूंना दिले.
ठाकरे बंधूंनी ऐक्य केल्यानंतर बेस्ट पतपेढीची पहिली निवडणूक लढवली होती, पण ती त्यांना गमवावी लागली. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची 9 वर्षांची सत्ता संपुष्टात आली. त्यामुळे खरं म्हणजे आशिष शेलार यांना जोर चढला. ठाकरे बंधूंनी एक निवडणूक गमावली म्हणजे त्यांची मुंबईतली ताकद कायमची संपली, असा आशिष शेलार यांचा समज झाला. म्हणूनच त्यांनी भाजप मधल्या दुसऱ्या फळीतल्या नेत्यांना आधी हरवून दाखवा आणि मग आमच्याशी लढायला या, अशी ठाकरे बंधूंना डिवचणारी भाषा वापरली. पण प्रत्यक्षात ठाकरे बंधूंची ताकद इतक्या लवकर संपणारी नाही हे लक्षात येताच त्यांनी स्वतःच्या नेतृत्वाच्या आधी लढण्यासाठी एक political buffer तयार करून ठेवला.
– ठाकरे बंधू घेऊ शकतात उसळी
कारण मुंबई महापालिकेची निवडणूक ठाकरे बंधूंसाठी वाटते तितकी सोपी नाही. त्याचबरोबर भाजपसाठी देखील सहजासहजी विजय मिळवण्याची नाही. ठाकरे बंधूंची ताकद एका निवडणुकीत कमी झाल्याने ती कायमची संपण्यासारखी नाही. उलट ज्या पद्धतीने लोकसभा निवडणुकीत भाजपला दणका बसल्यानंतर भाजपचे नेते सुधारले त्यांनी विधानसभा निवडणुकीसाठी चांगली तयारी केली आणि विधानसभा निवडणूक जिंकून दाखवली तसेच ठाकरे बंधू मुंबई आणि अन्य महापालिकांमध्ये करू शकतात. बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीतल्या पराभवातून योग्य तो धडा घेऊन संघटनात्मक बांधणी करून सत्ताधारी भाजपशी टक्कर घेऊ शकतात. त्या टकरीत कदाचित आशिष शेलार यांच्या नेतृत्वाखाली भाजपचा पराभव देखील होऊ शकतो. तसा कदाचित पराभव झालाच तर त्याची राजकीय किंमत आशिष शेलारांना चुकवावी लागू शकते. ही शक्यता लक्षात घेऊनच आशिष शेलार यांनी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी political buffer तयार करून ठेवलाय.
Ashish Shelar creates political buffer for Mumbai municipal elections
महत्वाच्या बातम्या
- ऑनलाइन गेमिंग उद्योगावर गदा येण्याची शक्यता, केंद्र सरकारकडून बंदीची तयारी!
- CSDS’ Sanjeev Kumar : खाेट्या आकडेवारीमुळे काॅंग्रेसवर ताेंडावर पडण्याची वेळ, सीएसडीएसचे संजीव कुमार यांनाही मागावी लागली माफी
- ही पाहा काँग्रेसची कृतघ्नता; सर्वोच्च नेत्यांना वाचविण्याचे निर्णय देणाऱ्या न्यायमूर्तींना हरणाऱ्या निवडणुकीत केलंय उभा!!
- Sanjay Rathod : मुख्यमंत्री लवकरच शेतकरी कर्जमाफीची घोषणा करणार; कर्जमाफीवर मंत्रिमंडळात चर्चा सुरू, मंत्री संजय राठोड यांची माहिती