वृत्तसंस्था
पुणे : आषाढी वारीतील मानाच्या दहा पालखी सोहळ्यांच्या वारी सोहळ्याला राज्य सरकारने परवानगी दिली आहे. यावर्षी देहू व आळंदी येथील प्रस्थान सोहळ्यासाठी प्रत्येकी 100 व उर्वरित आठ सोहळ्यासाठी प्रत्येकी 50 वारकऱ्यांना प्रस्थान सोहळ्यात सहभागी होता येईल, असे आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभागाने स्पष्ट केले आहे. Ashadhi Wari rules announced; Permission of 100 Warakaris for departure of Two palanquins
पंढरपूर येथील आषाढी वारीसंदर्भातील नियमावली जाहीर केली आहे. वारीचे आयोजन करताना कोविड-19 च्या प्रतिबंधासाठी केंद्र व राज्य सरकारने केलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन होईल याची दक्षता घ्यावी, असे आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभागाने निमावलीत नमूद केले आहे.
वाखरी येथून १.५ किमी पायी वारी
मानाच्या पालखी सोहळ्यांना पायी वारी प्रस्थान ठिकाणापासून विशेष वाहनाद्वारे वाखरी येथे पोचेल. तेथून पंढरपूरकडे १.५ किमी. अंतर प्रातिनिधिक स्वरूपात पायी वारी करण्यास परवानगी दिली आहे. सर्व मानाच्या पालख्यांचे पंढरपूरमध्ये दशमीच्या दिवशी आगमन होऊन पौर्णिमेच्या दिवशी प्रस्थान करण्यास मान्यता आहे. शासकीय महापूजा व विठ्ठल संतांच्या भेटीस गेल्यावर्षी प्रमाणे मान्यता देण्यात आली आहे.
Ashadhi Wari rules announced; Permission of 100 Warakaris for departure of Two palanquins
महत्त्वाच्या बातम्या
- अरुणाचल प्रदेशात लस घेणाऱ्याला चक्क वीस किलो तांदुळ, मोफत तांदळामुळे लसीकरणाला प्रतिसाद
- जेएनयू, जामियातील विद्यार्थ्यांना जवळपास वर्षाने मिळाला जामीन
- कोरोनाचे उगमस्थान असलेले वुहान पुन्हा मास्क नसलेल्या हजारो मुलांच्या गर्दीने चर्चेत
- ड्रॅगनच्या मुसक्या आवळण्यासाठी नाटोची सदस्य राष्ट्रे सरसावली, वर्चस्ववादाविरोधात एकत्र येण्याचे आवाहन
- चीनविरुद्धच्या संघर्षात धारातीर्थी पडलेले हुतात्मा संतोष बाबूंचा सूर्यापेटमध्ये पुतळा