• Download App
    महाराष्ट्र सांस्कृतिक धोरण समितीच्या कार्याध्यक्षपदी डॉ. विनय सहस्रबुद्धे यांची नियुक्ती As the working president of Maharashtra Cultural Policy Committee, Dr. Appointment of Vinay Sahasrabuddhe

    महाराष्ट्र सांस्कृतिक धोरण समितीच्या कार्याध्यक्षपदी डॉ. विनय सहस्रबुद्धे यांची नियुक्ती

    प्रतिनिधी

    मुंबई : महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक धोरण २०१० साली सांस्कृतिक कार्य विभागामार्फत तयार करण्यात आले आहे. या सांस्कृतिक धोरणाचा फेरआढावा घेण्यासाठी एक समिती नुकतीच गठीत करण्यात आली आहे. या समितीच्या कार्याध्यक्षपदी डॉ. विनय सहस्रबुद्धे यांची नियुक्ती करण्यात आली असल्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले. As the working president of Maharashtra Cultural Policy Committee, Dr. Appointment of Vinay Sahasrabuddhe

    नव्याने नियुक्त करण्यात आलेल्या समितीत सांस्कृतिक कार्यमंत्री हे अध्यक्ष असतील,तर डॉ. विनय सहस्त्रबुद्धे हे कार्याध्यक्ष असतील. सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव, उपसचिव, पर्यटन विभागाचे उपसचिव, पर्यटन संचालनालयाचे व्यवस्थापकीय संचालक,क्रीडा संचालनालयचे आयुक्त, पुराभिलेख संचालनालयाचे
    संचालक, दर्शनिका विभागाचे कार्यकारी संपादक व सचिव, भाषा संचालनालयाचे संचालक, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे संचालक, कला संचालनालयाचे संचालक, पुरातत्व व वस्तुसंग्रहालयाचे संचालक हे शासकीय सदस्य असतील.


    द फोकस एक्सप्लेनर : भारताची अर्थव्यवस्था 5 ट्रिलियन डॉलरची होणार, पण ही 8 आव्हाने समोर; वाचा सविस्तर…


    या शिवाय गिरीश प्रभुणे, नामदेव कांबळे, सुहास बहुळकर, कौशल इनामदार, बाबा नंदनपवार, जगन्नाथ हिलीम, सोनू दादा म्हस हे या समितीत अशासकीय सदस्य असतील. सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक हे या समितीचे सदस्य सचिव असतील.

    नव्याने नियुक्त करण्यात आलेली समिती सांस्कृतिक धोरणाच्या अंमलबजावणीचा आढावा घेणे, सांस्कृतिक बाबींचे स्वरूप काळाच्या ओघात बदलत असते. त्यामुळे बदलत्या परिस्थितीनुसार सांस्कृतिक धोरण सुसंगत करणे, तसेच विविध क्षेत्रातील तज्ञांकडून आणि सर्वसामान्यांना नागरिकांकडून धोरणाच्या संदर्भात प्राप्त सूचनांनुसार विचारमंथन करून नवीन धोरणाचा मसुदा शासनास सादर करणे असे कार्य अपेक्षित आहे. सदर समितीची बैठक दर तीन महिन्यांनी एकदा होणार आहे. या समितीचा कालावधी शासन निर्णय निर्गमित झाल्यापासून १ वर्ष अथवा शासन जोपर्यंत आदेश देईल तोपर्यंत असणार आहे.

    As the working president of Maharashtra Cultural Policy Committee, Dr. Appointment of Vinay Sahasrabuddhe

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Gold : सोन्याने नवा विक्रम केला प्रस्थापित, पहिल्यांदाच किंमत ९७ हजारांच्या जवळ पोहोचली

    अविश्वास ठरावाला तोंड देण्यापूर्वीच कर्जत जामखेड मध्ये रोहित पवार समर्थक नगराध्यक्षांचा राजीनामा; रोहित पवारांनी नगरपंचायतीची गमावली सत्ता!!

    Thackeray brothers ठाकरे बंधूंच्या व्हॅलेंटाईन गुलाबाला लांब लांब काटे; दोघांच्या सैनिकांनी फोडले वेगवेगळे फाटे!!