• Download App
    तीन राज्यांमध्ये झोपले, तसे विरोधक आज पत्रकार परिषदेतही झोपले!! फडणवीसांचा टोला As the three states slept, the opposition also slept in the press conference today

    तीन राज्यांमध्ये झोपले, तसे विरोधक आज पत्रकार परिषदेतही झोपले!! फडणवीसांचा टोला

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : महाराष्ट्र विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनावर अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला नेहमीप्रमाणे विरोधी पक्षांनी चहापानावर बहिष्कार घातला, पण त्यावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना टोला हाणला. त्यांच्यासाठी सुपारी पान ठेवले पाहिजे, मग ते येतील, असे ते म्हणाले. As the three states slept, the opposition also slept in the press conference today

    पण त्याचवेळी फडणवीसांनी तीन राज्यांमध्ये ते झोपले, तसे आजच्या विरोधी पक्ष नेत्यांच्या पत्रकार परिषदेतही त्यांचे तीन नेते झोपले होते, असा सवाई टोला हाणला.

     देवेंद्र फडणवीस म्हणाले :

    नुकतेच 4 राज्यात चक्रीवादळ आले, त्याचा परिणाम म्हणून हवामान विभागाने पूर्व विदर्भात पुढचे 3 दिवस पावसाचा अलर्ट दिला आहे. सर्व यंत्रणांना सज्ज राहण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.

    नागपूर अधिवेशन हे प्रामुख्याने विदर्भ आणि मराठवाडाच्या प्रश्नांवर चर्चा व्हावी, यासाठी होते, पण विरोधकांच्या पत्रात त्याबाबत उल्लेख सुद्धा नाही. 3 राज्यांत ते जसे झोपले, तसे त्यांचे तीन नेते आजच्या पत्रकार परिषदेत झोपले होते. विरोधकांना विदर्भ आणि मराठवाड्यातील प्रश्नांचा विसर पडला आहे.

     राज्याची अर्थव्यवस्था कशी वाढली??
    2013-14 : ₹16.49 लाख कोटी
    2023-24 : ₹35.27 लाख कोटी

    एनसीआरबीचा अहवाल हा नेहमी लोकसंख्या विचारात घेऊन वाचला पाहिजे. एकूण घडलेल्या घटना आणि क्राईम रेट यात मोठी तफावत असते. त्यामुळे आता एनसीआरबीचा अहवाल कसा वाचायचा, याचा अभ्यास विरोधकांनी केला पाहिजे आणि त्यांना त्याचे प्रशिक्षण दिले पाहिजे.

    नागपुरात केवळ 10 दिवस अधिवेशन असे फलक कुणी लावले तर ज्यांनी कधी नागपुरात अधिवेशनच घेतले नाही. नागपूर अधिवेशनाचा कालावधी आला की ते कोविड वाढला, असे सांगायचे. आमची मात्र पूर्ण वेळ अधिवेशन घ्यायची आणि त्यात सकारात्मक चर्चा करण्याची तयारी आहे. म्हणूनच 19 तारखेला कामकाज सल्लागार समितीची बैठक घेण्यात येणार आहे.

    प्रारंभी उद्धव ठाकरेंनी नाणारला विरोध केला, आता धारावीला विरोध करीत आहेत. पण हे लक्षात घ्या, धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या सर्व अटी-शर्ती या उद्धव ठाकरे सरकारने बदलल्या आहेत. त्यात कुठलाही बदल शिंदे सरकारने केलेला नाही. टीडीआरबाबत पारदर्शिता आणण्याचा निर्णय आम्ही घेतला.

    तेलंगणात काँग्रेस जिंकली की EVM चांगले, कर्नाटकमध्ये काँग्रेस जिंकली की EVM चांगले, पंजाबमध्ये आप जिंकले की EVM चांगले, पण भाजप जिंकला की EVM वाईट. विरोधकांकडे दुसरे मुद्देच नसल्यामुळे ते त्यावर त्यावरून आरोप करतात.

    EVM हॅकिंगचे प्रकरण सुप्रीम कोर्टात सुद्धा गेले होते. निवडणूक आयोगाने ओपन चॅलेंज दिले होते, EVM मध्ये गोंधळ होतो, हे सिद्ध करून दाखविण्यासाठी. पण एक व्यक्ती पुढे आली नाही. “इंडी” आघाडीच्या नेत्यांपुढे प्रश्न आहे की आपल्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह कसा निर्माण करायचा म्हणून ते आमच्यावर आरोप करून आपल्या कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत यापेक्षा बाकी काही नाही.

    As the three states slept, the opposition also slept in the press conference today

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Gold : सोन्याने नवा विक्रम केला प्रस्थापित, पहिल्यांदाच किंमत ९७ हजारांच्या जवळ पोहोचली

    अविश्वास ठरावाला तोंड देण्यापूर्वीच कर्जत जामखेड मध्ये रोहित पवार समर्थक नगराध्यक्षांचा राजीनामा; रोहित पवारांनी नगरपंचायतीची गमावली सत्ता!!

    Thackeray brothers ठाकरे बंधूंच्या व्हॅलेंटाईन गुलाबाला लांब लांब काटे; दोघांच्या सैनिकांनी फोडले वेगवेगळे फाटे!!