• Download App
    राष्ट्र सेवा दलाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नितीन वैद्य यांची बहुमताने निवड । As the National President of the National Service Force Nitin Vaidya elected by majority

    राष्ट्र सेवा दलाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नितीन वैद्य यांची बहुमताने निवड

    वृत्तसंस्था

    मुंबई : ज्येष्ठ पत्रकार नितीन वैद्य यांची रविवारी राष्ट्र सेवा दलाच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. मुंबईतील अंजुमन ईस्लाम सभागृहात झालेल्या मंडळाच्या राष्ट्रीय बैठकीत त्यांची र बहुमताने निवड झाली. देशातील २३ राज्यातील सेवा दल मंडळ सदस्य आणि फुल टायमर यांनी या निवडणुकीत मतदान केले. त्यापैकी २२८ मते नितीन वैद्य यांना मिळाली. तर विरोधी उमेदवार अलका एकबोटे यांना २ मते, अनुपकुमार पांडे यांना १ मत पडले. As the National President of the National Service Force Nitin Vaidya elected by majority

    निवडणूक अधिकारी म्हणून ज्येष्ठ साहित्यिक, निवृत्त आयएएस अधिकारी भारत सासणे यांनी काम पाहिले. यावेळी राष्ट्र सेवा दलाचे माजी अध्यक्ष डॉ. गणेश देवी, कार्यकारी विश्वस्त आमदार कपिल पाटील, पन्नालाल सुराणा, भरत लाटकर, अतुल देशमुख, विश्वस्त डॉ. जहीर काझी यांनी नितीन वैद्य यांचे अभिनंदन केले.



    नितीन वैद्य तीन दशके मीडिया क्षेत्रात सक्रिय आहेत. स्टार हिंदी, झीटीव्ही या चॅनेलची सूत्रं त्यांनी सांभाळली आहेत. दे धक्का, धुडगूस, मुरंबा हे गाजलेले चित्रपट त्यांनी रिलीज केले आहेत. स्टार प्लसमधील त्यांच्या कारकिर्दीत चॅनेलवर सत्यमेव जयते हा अमीर खान यांच्या सोबतचा कार्यक्रम गाजला. त्यांच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर, अहिल्याबाई होळकर आणि सावित्रीबाई फुले यांच्यावरच्या मालिका गाजल्या. महाराष्ट्र टाईम्सचे दिल्लीचे विशेष प्रतिनिधी म्हणून त्यांची कारकीर्द गाजली होती. समाजवादी आंदोलनात त्यांचा नेहमी सहभाग राहिला आहे.

    As the National President of the National Service Force Nitin Vaidya elected by majority

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Gold : सोन्याने नवा विक्रम केला प्रस्थापित, पहिल्यांदाच किंमत ९७ हजारांच्या जवळ पोहोचली

    अविश्वास ठरावाला तोंड देण्यापूर्वीच कर्जत जामखेड मध्ये रोहित पवार समर्थक नगराध्यक्षांचा राजीनामा; रोहित पवारांनी नगरपंचायतीची गमावली सत्ता!!

    Thackeray brothers ठाकरे बंधूंच्या व्हॅलेंटाईन गुलाबाला लांब लांब काटे; दोघांच्या सैनिकांनी फोडले वेगवेगळे फाटे!!